Study Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Study Tips : पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांचा असा घ्या अभ्यास, टेन्शन होईल दूर

Exam Tips : ऑक्टोबर महिना सुरू झाला असून आता मुलांच्या सहामाही परीक्षांना सुरुवात होईल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Study Tips For Exam :

ऑक्टोबर महिना सुरू झाला असून आता मुलांच्या सहामाही परीक्षांना सुरुवात होईल. अनेकदा काही मुले परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायला सुरुवात करतात. त्यामुळे बऱ्याचदा गोंधळ उडतो आणि अभ्यास लक्षात राहत नाही. परिणामी परिक्षेत कमी मार्क्स मिळतात. त्यामुळे अभ्यास करताना रट्टा मारण्याशिवाय गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अभ्यास करताना मुले अनेकदा विषय समजून न घेता रट्टा मारतात. याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. रट्टा मारण्याशिवाय विषय समजून घेतल्याने अभ्यास करणे अधिक सोपे जाते. स्मरणशक्ती जेवढी जास्त चांगली तेवढाच त्याच्या अभ्यासावर चांगला परिणाम होतो. अभ्यास करताना गोष्टी समजून घ्यायच्या असतात. मनापासून लक्ष देऊन व्यवस्थित अभ्यास करावा.

शाळेतील अभ्यास हा फक्त पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित असतो. त्यामुळे बाहेरच्या जगात स्वतः चे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी सर्व विषयांचे सखोल ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.

रट्टा मारल्याने तुम्ही उत्तम पाठांतर करु शकता परंतु तुमच्या ज्ञानात वाढ होत नाही. रट्टा मारल्याने अभ्यास काही काळापुरताच लक्षात राहतो. याउलट विषय समजून घेतल्याने गोष्टी खूप काळासाठी लक्षात राहतात.

रट्टा मारल्याने मुलांचा मानसिक विकास होत नाही. व्यवस्थित मन लावून काम केल्याने बौद्धिक क्षमता वाढते.

रट्टा मारल्याने पाठांतर करण्यासाठी शरीरावर आणि मनावर थकवा येतो. मूळ संकल्पना समजून घेतल्याने गोष्टी फार काळ आपल्या लक्षात राहतात.

रट्टा मारुन अभ्यास केल्याने प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर करु शकत नाही. विषयाचा अर्थ समजून घेतल्याने गोष्टी अधिक सोप्या होतात.

अभ्यास केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. स्मरणशक्ती चांगली राहिल्याने त्याचा वापर रोजच्या जीवनात होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT