Stress And Diabetes, Is stress a causes of diabetes, Does stress and anxiety affect blood sugar Saam Tv
लाईफस्टाईल

Stress And Diabetes: अधिकच्या तणावामुळे जडू शकतो मधुमेहाचा विकार, कशी कराल यावर मात?

Is stress a causes of diabetes : तणाव रक्तातील साखरेवर परिणाम करतो. त्यामुळे आपल्याला मधुमेहाचा आजार जडू शकतो. जर तुम्ही देखील अधिकचा ताण घेत असाल तर वेळीच थांबा, यावर मात कशी कराल जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Does stress and anxiety affect blood sugar :

बैठी जीवनशैली, कामाच्या पद्धती, कमी झोप आणि अधिकचा ताण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. सततचा ताण घेतल्याने आपण अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतो.

संशोधनातून असे दिसून आले आहे की, तणाव (Stress) रक्तातील साखरेवर (Sugar) परिणाम करतो. त्यामुळे आपल्याला मधुमेहाचा (Diabetes) आजार जडू शकतो. जर तुम्ही देखील अधिकचा ताण घेत असाल तर वेळीच थांबा, यावर मात कशी कराल जाणून घेऊया.

1. तणाव आणि मधुमेह

अधिक स्ट्रेस घेतल्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन बाहेर पडतो. हे रसायन ग्लुकोज वाढवण्यास जबाबदार आहे. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले नसते. त्यामुळे ताण घेणे टाळा.

2. तणावावर मात कशी कराल?

1. ध्यान

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ताण कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान केले तर इन्सुलिन घेण्याची गरज नाही. तसेच योगासने आणि प्राणायम करुन मधुमेही रुग्ण स्वत:ला निरोगी ठेवू शकता.

2. स्वत:ची काळजी

तणावामुळे वाढणारी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाणे कठीण होते. परंतु, स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. तणावाव्यतिरिक्त इतर गोष्टींमुळे देखील रक्तातील साखरेची पातळी वाढते. यासाठी आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करुन, पुरेशी झोप आणि व्यायाम करुन अनेक आजारांवर मात मिळवता येते.

3. स्वत:ला व्यस्त ठेवा

आपल्याला रिकामा वेळ मिळाला की, आपण अतिविचार करु लागतो. त्यामुळे अधिकचा ताण येतो. यासाठी तुम्हाला आनंद मिळेल या गोष्टी करा. तुम्ही बाहेर फिरायला जा, स्वत:ला व्यस्त ठेवा, मित्रांसोबत वेळ घालवा. ज्यामुळे तुम्ही व्यस्त राहाल आणि तणावावर मात कराल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? या ठिकाणी धावणार नवीन बुलेट ट्रेन

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

SCROLL FOR NEXT