Stress, Stress Effects on Health, Side effects of stress  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

तणावामुळे बिघडू शकते आपले शारिरीक व मानसिक आरोग्य

तणावाचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : सध्या तणाव हा कोणत्याही व्यक्तीला येऊ शकतो. तणावाचे वाढते प्रमाण लक्षात घेता हा आजार बनत चालला आहे. तणावामुळे आपण आपल्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करतो.

हे देखील पहा -

तणाव का येतो ? त्याचे मुख्य कारण काय ? हे कोणीही सांगू शकत नाही. परंतु, अधिक तणावामुळे आपल्याला अनेक आजारांना बळी पडावे लागते. तणावाचे कोणतेही कारण असू शकते पण याचाकडे आपण अधिक काळ दुर्लक्ष करु शकत नाही. त्यामुळे याचा परिणाम आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तणावावर (Stress) मात कशी करायची व त्यात येणाऱ्या समस्यांना सामोरे कसे जायचे हे पाहूया.

१. अधिक प्रमाणापासून आपल्याला तणाव असेल तर आपल्याला नैराश्य, चिंता आणि व्यक्तिमत्व विकारांना बळी पडू शकता. याशिवाय उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका (Heart attack) येऊ शकतो.

२. तणाव वाढल्यास आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊन आपले वजन वाढू शकते. तसेच स्त्रियांमध्ये याचे प्रमाण मासिक पाळी, मुरुमे, केस गळणे यांसारखी लक्षणे आढळून येतात.

३. तणावावर मात करण्यासाठी आपण ज्या प्रश्नांवर किंवा समस्येवर आपल्याला उत्तर मिळत नसेल तर आपण आपला दृष्टिकोन बदलायला हवा.

४. सतत आक्रमक होण्यापेक्षा आपण आपल्या रागावर नियंत्रण कशाप्रकारे करु शकतो यांचा विचार करा.

५. तणाव कमी करण्यासाठी आपण नियमित ध्यान, व्यायाम व योगासने करावी. त्यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

६. तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही वाईट व्यसनाचा आधार घेऊ नका. त्यामुळे तो अधिक वाढू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

SCROLL FOR NEXT