Curry Leaves Saam TV
लाईफस्टाईल

Curry Leaves : कढीपत्त्याची पाने लगेच खराब होतात? मग या ट्रीक्सने स्टोर करा, एकही पान खराब होणार नाही

Storing Curry Leaves : कढीपत्ता टिकत नसेल, सतत खराब होत असेल तर त्यासाठी आम्ही काही ट्रिक्स शोधल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही देखील कढिपत्ता जास्त काळ टिकवून ठेवू शकता.

Ruchika Jadhav

कढीपत्ता रोजच्या जेवणात हमखास वापरला जातो. कढीपत्त्याची पाने आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात. तसेच भाजीत आणि विविध पदार्थांमध्ये याचा तडका दिला की, पदार्थ आणखी चविष्ट लागतात. कच्चा मसाला घेतला की त्यावर कढीपत्ता सुद्धा मिळतो. मात्र सध्या पावसाळा सुरू असल्याने पानांना लगेच मॉश्चर पकडतं आणि याची पाने खराब होतात.

घरी जास्तीचा कढीपत्ता आणला की, तो जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे पदार्थात न वापरताच खराब झाल्याने तो फेकावा लागतो. आता तुमच्या घरी सुद्धा कढीपत्ता टिकत नसेल, सतत खराब होत असेल तर त्यासाठी आम्ही काही ट्रिक्स शोधल्या आहेत. त्याचा वापर करून तुम्ही देखील कढिपत्ता जास्त काळ टिकवून ठेवू शकता.

कढीपत्ता सुकवून घ्या

जास्तवेळ कढीपत्ता फ्रेश रहावा यासाठी त्याची पाने छान सुकवून घ्या. पानांमध्ये ओलसरपणा असला की ते खराब होतात. भाजीपाला सुकूनये फ्रेश रहावा यासाठी विक्रेते त्यावर पाणी टाकतात. किंवा थोडं ओलं करून भिजवून ठेवतात. त्यामुळे उन्हात कढीपत्ता सुकत नाही. मात्र असाच कोला कढीपत्ता आपण घरी एखाद्या कंटेनरमध्ये ठेवला तर तो खराब होतो. त्यामुळे कढीपत्ता कायम सुकवून घ्या.

फ्रीजरचा वापर

कढीपत्ता आणखी छान राहावा यासाठी तुम्ही फ्रीजरचा देखील वापर करू शकता. त्यासाठी आधी कढीपत्त्याची पाने छान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर प्लास्टिकच्या जिप लॉक बॅगमध्ये ठेवून घ्या. ही बॅग हवा बंद असावी. त्यानंतर फ्रिजरमध्ये कढीपत्ता चांगला राहतो.

कढीपत्त्याचा चुरा

अनेक ठिकाणी हवामान आणि वातावरण वेगळं असतं. त्यामुळे कढीपत्ता खराब होतो. असं होत असल्यावर कढीपत्ता छान एका कढईत नुसता भाजून घ्या आणि मग त्याचा चूरा करून घ्या. हा चूरा हवा बंद काचेच्या एका डब्ब्यात भरून ठेवा. अशा पद्धातीने तुम्ही अगदी पहिनाभर सुद्धा कढीपत्ता साठवून ठेवू शकता.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

SCROLL FOR NEXT