Smartphone side effects  Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone side effects : सावधान! सोशल मीडियावर फोटो शेअर करणे आजच थांबवा? लाईक्सचं वेड पडेल महागात

तुमच्या या फोटोंचा दुरुपयोग करुन एका मिनिटात तुमचे फेक फोटो तयार होवू शकतात.

कोमल दामुद्रे

Smartphone side effects : सध्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याची प्रचंड क्रेझ आहे. रोज नवनवीन स्टाईलमध्ये, पोझमध्ये फोटो पोस्ट करुन लाईक मिळवण्याची जणू चढाओढच युवा वर्गात लागलेली असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याचा हा छंद आता महागात पडू शकतो. तुमच्या या फोटोंचा दुरुपयोग करुन एका मिनिटात तुमचे फेक फोटो तयार होवू शकतात. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेवू.

डीप फेक या शब्दाचा अर्थ असा आहे की असे फोटो किंवा व्हिडिओ ज्यामध्ये तुमचा चेहरा आणि शरीर दिसेल, परंतु प्रत्यक्षात मात्र तो तुमचा नसेल. उदाहरणार्थ, कोणीतरी तुमच्या घराच्या खुर्चीवर बसून काढलेला फोटो डीप फेकद्वारे एडिट करु शकते आणि तुम्हाला क्लब, चित्रपटगृह किंवा खेळाच्या मैदानात किंवा दूरच्या देशात कुठेही दाखवू शकते. याद्वारे, तुम्हाला लहान मूल, वृद्ध किंवा इतर कोणत्याही रूपात किंवा पोशाखात दाखवले जाऊ शकते. हे फोटो इतक्या सफाईदारपणे एडिट केले जातात की तुम्हीही ते ओळखू शकणार नाही. आर्टिफिशिअल इंटेलिजंन्ससोबतच असे अनेक ‍ऍप्स आहेत जे मुळ फोटोंशी छेडछाड करु शकतात.

1. कसे तयार होतात फेक फोटो?

कोणत्याही व्यक्तीचे असे फेक फोटो तयार करण्यासाठी त्याचे पाच किंवा त्यापेक्षा जास्त फोटो आवश्यक असतात. त्यानंतर आर्टिफिशिअल इंटेलिजंन्स या फोटोंचा अभ्यास करते आणि सॉफ्टवेअरमधील नवीन चेहऱ्यात त्याचे रुपांतर करतो. यानंतर त्या फोटोचे हवे तितके फेक फोटो तयार करता येतात. ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही.

2. या फेक फोटोंपासून वाचण्यासाठी काय कराल?

या फेक फोटोंपासून (Photo) वाचण्यासाठी उपाय म्हणजे तुमच्या सोशल मीडियावरील फोटो वेळीच डिलीट करा. हाच या धोक्यापासून वाचण्याचा उपाय असू शकतो. त्यामुळेच या फेक फोटोंपासून वाचण्यासाठी सुरक्षितता घेणे गरजेचे आहे. दरम्यान या फेक फोटोंच्या संकटांपासून वाचण्यासाठी पर्याय शोधणे सुरू आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर एक असा पर्याय शोधत आहेत ज्यामधून अशा फेक एपच्या माध्यमातून छेडछाड केलेल्या फोटोवर आपोआप वॉटरमार्क येईल. ज्यामुळे अशा फोटोंना ओळखणे शक्य होईल. तोपर्यंत आपण स्वतःहून काळजी (Care) घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

Agriculture Crisis: राजकारणानं घेतला शेतकऱ्याचा बळी? तहसील कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

SCROLL FOR NEXT