Dahi Handi Safety Tips Saam TV
लाईफस्टाईल

Dahi Handi Safety Tips : दहीहंडी पाहायला जाताय? मग 'या' गोष्टींचं भान ठेवा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Dahi Handi Festival Safety Guidelines : दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर काही गोष्टींची व्यस्थीत काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. अन्यथा तुमच्या आरोग्यासह अन्य समस्या ओढावण्याची शक्यता असते.

Ruchika Jadhav

राज्यात उद्या सर्वत्र दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळणार आहे. आज कृष्णजन्माष्टमी साजरी झाल्यानंतर रात्री लगेचच उंचावर चौकाचौकात दहीहंडी बांधली जाणार आहे. दहीहंडी सणाला राज्यात एक वेगळं महत्व आणि परंपरा आहे. परिसारतील सर्व गोविंदा एकत्र येतात, परिसरातील उंच दहीहंडी फोडतात. राज्यात दहीहंडी फोडण्याला एक सहासी खेळ सुद्धा म्हटलं जातं.

दहीहंडीचा हा सहासी खेळ सर्वांनाच आवडतो. प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती बाहेर पडतो आणि हा उत्सव पाहतो. घराबाहेर पडून दहीहंडीचा खेळ पाहण्याची मजाच काही और आहे. आता तुम्ही सुद्धा दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर काही गोष्टींची व्यस्थीत काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. अन्यथा तुमच्या आरोग्यासह अन्य समस्या ओढावण्याची शक्यता असते.

'या' व्यक्तींनी गर्दीत जाऊ नये

सध्याचे वातावरण योग्य नाही. पावसाळ्यामुळे अनेक व्यक्तींना सर्दी, खोकला आणि ताप असे साथीचे आजार सुरु आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला सुद्धा हा त्रास असेल तर जास्त गर्दीत जाऊ नका. कारण तुमच्यामुळे अन्य व्यक्तींना सुद्धा या समस्या उद्भवू शकतात. तसेच तुम्हाला सुद्धा या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

लहान मुलांची काळजी घ्या

हंडी फोडताना पाहायला फार छान वाटते. अनेक व्यक्ती आपल्या लहान मुलांना सुद्धा दहीहंडी फोडताना पाहायला मिळावी म्हणून बाहेर घेऊन येतात. चौकात अशावेळी प्रचंड गर्दी होते. या गर्दीत लहान मुलांचे फार हाल होतात. तसेच तुमचे थोडे जरी दुर्लक्ष झाले तर तुमची लहान मुलं या गर्दी हरवली जाऊ शकतात. त्यामुळे गर्दीत मुलांची काळजी घ्या.

स्वत:च्या मौल्यवान वस्तूंची काळजी

गर्दीच्या ठिकाणी आपण स्वत: आपल्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे. सण उत्सव असल्याने सर्व व्यक्ती सुंदर ड्रेस आणि दागिने परिधान करतात. मात्र गर्दीतून जाताना आपण आपल्या अशा मौल्यवान वस्तू घरीच ठेवल्या पाहिजेत. कारण अशा ठिकाणी काही चोर असल्यास ते आपल्या वस्तू लंपास करण्याची शक्यता असते. तसेच अशावेळी आपला फोन सुद्धा हरवण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT