SBI Recruitment 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Bank Recruitment 2023 : सरकारी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी! SBI मध्ये पदभरती सुरु, अर्ज प्रक्रिया कशी कराल?

SBI Job Vacancy : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकतेच काही पदांवर भरती सुरु करण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

SBI Recruitment 2023:

सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकतेच काही पदांवर भरती सुरु करण्यात आली आहे.

SBI मध्ये रिजॉल्वर या पदासाठी पदभरती सुरु केली आहे. यासाठी सेवानिवृत्त बँक अधिकारी यासाठी अर्ज करु शकता. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज कसा कराल हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार या भरतीसाठी एकूण ९४ जागा रिक्त आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर फॉर्म भरावा. हा फॉर्म भरण्यासाठी उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला (sbi.co.in) भेट देऊ शकता.

1. शिक्षणाची मर्यादा किती?

SBI ने या पदांवर अर्ज (Application) करण्यासाठी शिक्षणाची मर्यादा ठेवलेली नाही. या पदांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी अर्ज करू शकतात. यामध्ये उमेदवारांना त्या क्षेत्रातील कामाचे ज्ञान आणि अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

2. अर्जाची अंतिम तारीख कधी ?

SBI मध्ये या पदांसाठी १ नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदाची अंतिम तारीख आहे २१ नोव्हेंबर २०२३. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपात असणार आहे. त्यासाठी उमेदवारांना एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट द्यावी लागेल.

3. उमेदवराची निवड कशी होणार?

रिजॉल्वर या पदासाठी SBI मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करेल. तसेच ही निवड प्रक्रिया कागदपत्रांच्या आधारे घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते निलेश निकम सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

Budget 2026 Live Updates: १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार- निर्मला सितारामन

Maharashtra Politics: खरंच NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाली का?, सुनील तटकरेंनी स्पष्ट सांगितलं...

New Income Tax Act: अर्थसंकल्पात करदात्यांसाठी मोठी घोषणा! नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून लागू

College Building Collapse : रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, ९ जखमी, १ गंभीर

SCROLL FOR NEXT