Solo Travelling Saam Tv
लाईफस्टाईल

Solo Travelling: महिलांमध्ये वाढतोय सोलो ट्रिपचा ट्रेंड; जवळपास ३५ टक्के महिला एकट्या फिरतायत जग

Women Solo Travelling Trend Increasing: सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये महिलांचा जास्तीत जास्त समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या काळात कामाचा ताण आणि वेळेचा अभाव यामुळे सर्वचजण खूप त्रस्त आहेत. त्यामुळे स्वतः ला फ्रेश करण्यासाठी अनेक लोक वेळ काढून फिरायला जातात. फिरायला जाताना अनेक लोक कुटुंबासोबत,फ्रेंड्ससोबत तर कधी एकटेच जातात.स्वतः चा मूड फ्रेश करण्यासाठी रोजच्या कामातून ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे आहे.त्यामुले सध्या सोलो ट्रॅव्हलर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोलो ट्रॅव्हल करण्याऱ्यांमध्ये महिलांचा सर्वात जास्त सहभाग असल्याचे दिसत आहे.

अनेक ट्रॅव्हल एजन्सीच्या रिपोर्टनुसार, जवळपास ४० टक्के महिला या मनमोकळेपणाने, बिनधास्त प्रवास करत आहेत. तर जवळपास ३५ टक्के महिला या सोलो ट्रॅव्हल करत आहे. स्वतः च्या ऑफिसच्या कामासाठी किंवा बिझनेससाठी त्या एकट्या प्रवास करत आहे. प्रत्येक महिला ही आपल्या कामासाठी जाताना वेगवेगळ्या वाहनांचा वापर करतात.

महिलांचे सोलो ट्रॅ्व्हलिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आपल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत बदल होताना दिसत आहे. सध्या अनेक ट्रॅव्हल एजन्सी आहेत. या एजन्सीच्या मदतीने महिला आपली संपूर्ण ट्रीप प्लान करतात. परदेशात एकट्या फिरतात. महिला या भारताबाहेर प्रवास करताना जास्त दिसत आहे. त्यांनी परदेशातील प्रवासाला जास्त पसंती दिली आहे. याचे कारण म्हणजे वाहतूकीचे पर्याय. भारतातील वाहतूक व्यवस्था ही अजून चांगली होणे गरजेचे आहे. स्थानिक ठिकाणी वाहतूकीचे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असायला हवे.

महिला या संपूर्ण जगभरात फिरताना दिसत आहे. स्वतः चे घर, काम सांभाळून त्या आपला बिझनेस सांभाळताना दिसत आहे. त्याचसोबत अनेक महिला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोलो ट्रॅव्हल करतात. अनेक महिला बाईक प्रवास करुन लेह, लडाखला जातात, ट्रेकिंग करतात. येत्या काळात महिलांच्या सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये अजूनच वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT