Smartphone Radiation Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Radiation: मोबाईलचं रेडिएशन कसं चेक कराल? शरीरावर होतात घातक परिणाम

Smartphone Side Effects : मोबाइलच्या किरणोत्सर्गात दीर्घकाळ राहिल्याने मेंदूचे विकार, हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार होतात

कोमल दामुद्रे

How To Check SAR Value : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला हातात असतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा तो स्मार्टफोन. दैनंदिन जीवनातील सगळ्यात जवळचा असणारा गॅजेट हा मोबाइल आहे. कोणत्या ना कोणत्या कामासाठी आपल्याला त्याचा वापर होत असतो.

परंतु,आपल्याला हे माहित नाही की, यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आपल्याला शरीरासाठी घातक ठरतात. याच्या किरणोत्सर्गात दीर्घकाळ राहिल्याने मेंदूचे विकार, हार्ट अटॅक सारखे गंभीर आजार होतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी आपल्याला रेडिएशनच्या संख्येवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. डिव्हाइसचे SAR मूल्य सहजपणे तपासले जाऊ शकते.

1. फोनवर SAR मूल्य कसे तपासाल?

मोबाइल (Mobile) फोनचे SAR मूल्य तपासण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. वापरकर्त्याने यासाठी आपल्या फोनवर USSD कोड *#07# हा नंबर डायल करणे आवश्यक असते. त्यावरुन आपल्याला मोबाइल रेडिएशनची माहिती तपासता येते.

2. SAR मूल्य काय आहे?

मोबाइल फोनसाठी SAR मर्यादा 1.6W/kg आहे. जर मोबाईल फोनचे SAR मूल्य यापेक्षा कमी असेल तर आरोग्याला (Health) धोका नसतो. तसेच फोनचे SAR मूल्य ही मर्यादा जास्त असल्यास आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. काही प्रीमियम फोनमध्ये कोड डायल करुन SAR मूल्याची माहिती मिळत नाही. अशावेळी वापरकर्त्यांनी SAR मूल्य जाणून घेण्यासाठी डिव्हाइसच्या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट देऊ शकतात.ही माहिती सामान्यतः डिव्हाइसच्या वापरकर्ता मॅन्युअलमध्ये देखील उपलब्ध असते, लोकांना SAR मूल्य काय आहे आणि त्याचे महत्त्व समजण्यास मदत होते.

3. SAR म्हणजे काय?

SAR, ज्याचे पूर्ण नाव 'विशिष्ट शोषण दर' आहे. मोबाईल फोन, टॅब्लेट आणि वायरलेस डिव्हाइसेस यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या डिझाइनद्वारे तयार केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे परिणाम मोजण्यासाठी याचा वापर केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT