Benefits of restarting a smartphone AI Image
लाईफस्टाईल

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Mobile Software Update : सॉफ्टवेअर अपडेटनंतर मोबाईल रीस्टार्ट करावा का? फोन रीस्टार्ट करण्याचे फायदे, आठवड्यातून एकदा रीस्टार्ट करण्याचे महत्त्व आणि मोबाईल सुरळीत ठेवण्याच्या टिप्स जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • सॉफ्टवेअर अपडेटनंतर काही बदल लागू होण्यासाठी मोबाईल रीस्टार्ट करणे आवश्यक

  • रीस्टार्ट केल्याने काही किरकोळ समस्या दूर होतात

  • आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट करणे बंधनकारक नाही

  • मोबाईल हँग होत असल्यास किंवा अॅप्स स्लो चालत असल्यास रीस्टार्ट करून पाहता येते

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही, तर बँकिंग, ऑनलाइन खरेदी आणि मनोरंजनासाठीही तो महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे मोबाईल सुरक्षित आणि सुरळीत चालणे आवश्यक आहे. यासाठी कंपन्यांकडून वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट दिले जातात. मात्र, अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल आपोआप रीस्टार्ट झाला नाही, तर तो स्वतःहून बंद करून पुन्हा सुरू करावा का? असा प्रश्न अनेकांना पडतो.याचे उत्तर आहे 'हो'. पण हे असं का करावं? जाणून घ्या सविस्तर

मोबाईल रीस्टार्ट केल्याने काय होते?

सॉफ्टवेअर अपडेटमुळे फोनमध्ये नवीन फीचर्स, सिक्युरिटी आणि काही समस्या असतील तर त्यावर उपाय उपलब्ध होतात. मात्र, तुमच्या मोबाईलमध्ये बदल योग्य प्रकारे होण्यासाठी अनेकदा डिव्हाइस रीस्टार्ट करणे आवश्यक असते. फोन पुन्हा सुरू केल्यामुळे त्यातील तात्पुरत्या प्रक्रिया थांबतात आणि सिस्टम नव्याने काम करू लागते. विशेष म्हणजे, मोबाईल वारंवार अडकत असेल, अॅप्स उघडायला वेळ लागत असेल किंवा इंटरनेट कनेक्शनमध्ये अडचणी येत असतील, तर रीस्टार्ट करणे उपयोगी ठरू शकते. त्यामुळे काही किरकोळ समस्या दूर होतात.

आठवड्यातून एकदा मोबाईल बंद करावा का?

मोबाईलचा वापर दिवसभर सुरू असल्यामुळे अनेक जण तो कित्येक दिवस बंद करत नाहीत. मात्र, अधूनमधून फोन रीस्टार्ट केल्याने फोन छान सुरु राहतो. आठवड्यातून एकदा फोन रीस्टार्ट केल्याने तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. रीस्टार्ट करणे ही सक्तीची नसली, तरी काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी हा सोपा उपाय आहे.

अपडेट पूर्ण झाल्यानंतर फोन व्यवस्थित सुरू होतोय का, इंटरनेट आणि आवश्यक अॅप्स योग्य प्रकारे काम करत आहेत का, हे तपासा. फोनमध्ये अडचणी कायम असल्यास उपलब्ध सिस्टम अपडेट्स तपासा. विनाकारण कॅशे किंवा नेटवर्क सेटिंग्ज हटवण्याची गरज नाही. एकंदरीत, सॉफ्टवेअर अपडेटनंतर मोबाईल रीस्टार्ट करणे ही सोपी पण उपयुक्त सवय आहे. यामुळे फोन सुरळीत ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र, चांगल्या परफॉर्मन्ससाठी नियमित अपडेट्स तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

फडणवीसांनी त्यांना सोडलं तर समजायचं त्यांचाच हात आहे! व्हायरल ऑडिओ क्लिपवरून जरांगे पाटलांचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT