Tanning Removal Tips freepik
लाईफस्टाईल

Tanning Removal Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे पायांवर चप्पलचे डाग आलेत? टॅनिंगवर मात करणारे ३ घरगुती उपाय

Foot Tan Removal: जर उष्णतेमुळे तुमच्या पायांवर चप्पलांचे डाग झाले असतील, तर घरगुती उपाय करून टॅनिंग कमी करा आणि त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवण्याचा प्रयत्न करा.

Dhanshri Shintre

उन्हाळ्यात टॅनिंग होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. सूर्याच्या थेट किरणांमुळे त्वचेला सनबर्न आणि टॅनिंगची समस्या होते. आपला चेहरा आणि हात टॅनिंगपासून जपला जातो, पण पायांवरील उघड्या भागांवर टॅनिंगचे डाग सहज दिसतात आणि ते विचित्र वाटतात. अशा वेळी घरगुती उपाय करून पायांवरील टॅनिंग कमी करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला पायांची टॅनिंग दूर करण्याचे प्रभावी घरगुती उपाय सांगत आहोत.

पहिला उपाय

या घरगुती उपायासाठी काकडी किसून त्याचा रस काढा किंवा थेट रस वापरा. त्यात लिंबाचा रस मिसळा आणि कापसाने टॅन झालेल्या पायांवर लावा. काही वेळ ठेवा, नंतर पाणीने धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा.

दुसरा उपाय

हे करण्यासाठी बेसन एका भांड्यात घ्या आणि त्यात दही मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. त्यात थोडी हळद घालून टॅन झालेल्या पायांवर लावा. १५-२० मिनिटांनी हलक्या हाताने स्क्रब करून स्वच्छ धुवा. आठवड्यातून २-३ वेळा वापरल्यास पाय उजळतील.

तिसरा उपाय

टोमॅटोचा रस काढा आणि एका भांड्यात घ्या. त्यात थोडे कोरफडी जेल मिसळा, पेस्ट जाडसर ठेवा. हळूवारपणे पायांवर लावा आणि किमान अर्धा तास ठेवा. नंतर मालिश करून पाय स्वच्छ करा. या उपायाने पायांना नैसर्गिक चमक मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT