Sleep Issues With PCOS Saam Tv
लाईफस्टाईल

Sleep Issues With PCOS : मासिक पाळीच्या त्रासामुळे झोप लागत नाही? हे घरगुती उपाय करुन पाहा

Polycystic Ovary Syndrome : PCOS मुळे महिलांच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते.

कोमल दामुद्रे

PCOS Symptoms :

दिवसभर फ्रेश राहाण्यासाठी आपल्याला रात्रीची पुरेशा प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे. झोप नीट झाली नाही की, आपली चिडचिड होते, डोळे दुखू लागतात. तसेच दिवसभर थकवाही जाणवतो. झोप पूर्ण न होणे याचे मोठे कारण PCOS.

PCOS मुळे महिलांच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे झोप, पचन आणि इतर अनेक गोष्टींवर परिणाम होतो. जर तुम्हालाही याचा त्रास असेल आणि झोप व्यवस्थित पूर्ण होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला वेळेवर झोप येईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. रात्रीचे जेवण झोपण्याच्या २-३ तास ​​आधी घ्या

चांगल्या झोपेसाठी (Sleep) रात्रीचे जेवण झोपण्याच्या २-३ तास ​​आधी करावे. जर तुम्हाला PCOS मुळे त्रास होत असेल तर याची विशेष काळजी घ्या. कारण PCOS मध्ये पचना संबंधित समस्या होऊ शकते. त्यामुळे रात्रीचे जेवण (Food) झोपण्याच्या २ ते ३ तासाआधी करा. त्यामुळे तुमचे जेवण लवकर पचेल आणि झोपही पूर्ण होईल.

2. संध्याकाळनंतर कॅफिनचे सेवन करू नका

दुपारी जेवल्यानंतर चहा-कॉफीचे (Coffee) सेवन करणे टाळा. पीसीओएसचा त्रास असल्यास कॅफिनच्या सेवनाने झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे चहा-कॉफीसारखे कॅफिनयुक्त पेये दुपारी ४ नंतर घेऊ नका. तुम्ही झोपण्याच्या 3-6 तास आधी सुमारे 400 मिलीग्राम कॅफीन घेतल्यास लवकर झोप येत नाही.

3. सकाळचे कोवळे ऊन

चांगल्या झोपेसाठी सूर्यप्रकाशही महत्त्वाचा आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे आपल्या आरोग्यावर प्रभाव पडतो. त्यात असणारे घटक स्लीप हार्मोन तयार करतात. त्यामुळे सकाळी किमान अर्धा तास सूर्यप्रकाश घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT