Desk Job Cancer Risks google
लाईफस्टाईल

Desk Job Cancer Risks: 8 तास बसून काम, ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्यांना वॉर्निंग, कॅन्सरचा अधिक धोका, काय सांगतात डॉक्टर?

Colon Cancer Awareness: दररोज ८ तास बसून काम केल्याने कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. डॉक्टरांचा इशारा—नियमित हालचाल, व्यायाम आणि संतुलित आहाराने हा धोका टाळता येऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

लोक त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करताना दिसतायेत. त्यामध्ये कामाच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. आता लोक घरबसल्याही काम करून पैसे कमवू शकतात. कारण आता डिजिटल उपकरणं किंवा पद्धती आल्यात. त्यामध्ये शारिरीक मेहनीची यामध्ये फारशी गरज नसते. यामध्ये एका खुर्चीवर बसून तासंतास तुमच्या लॅपटॉपवर काम करू शकता. पण हीच सवय तुम्हाला एका गंभीर आणि जीवघेण्या आजाराला सामोरं जाण्यास भाग पाडू शकते. पुढे तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

दिवसातून आठ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सतत बसून राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. तुम्ही रोज तासंतास बसून राहत असाल तर तुमच्या शरीरातल्या नैसर्गिक प्रक्रिया धिम्या गतीने काम करायला सुरुवात करतात. त्यामुळे तुमचं पचन, मेटाबॉलिझम आणि शरीरातलं इन्फ्लेमेशन यासगळ्यावर त्याचा परिणाम होतो.

डॉक्टरांच्या मते, जास्तवेळ बसून राहिल्यावर शरीरातले स्नायू निष्क्रिय होतात आणि कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. त्यामुळे तुमचं वजन वाढतं, इन्सुलिनचा बॅलेन्स बिघडतो आणि क्रॉनिक इन्फ्लेमेशन वाढू शकतं. यासगळ्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत जातो. तसेच कमी हालचालींमुळे आतड्यांची हालचालही कमी आणि घातक पदार्थ आतड्यांच्या आतल्या भागाशी जास्त वेळ संपर्कात राहतात.

यामुळे पेशींमध्ये वाढ होऊन पुढे कोलन कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. कारण याच्या लक्षणंही लघवीचा त्रास, मलात रक्त येणं, अचानक वजन कमी होणं, थकवा आणि पोटदुखी ही आहेत. जी तुम्हाला तासंतास बसून राहिल्यामुळे जाणवू शकतात. म्हणूनच दर ३० ते ६० मिनिटांनी उठून चालणं, रोज व्यायाम करणं, फायबरयुक्त आहार घेणं आणि पुरेसं पाणी पिणं या सवयी फॉलो करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT