First FIR Registered for Feeding Pigeons saamtv
लाईफस्टाईल

खिडकीबाहेर कबुतरांच्या विष्ठेमुळे त्रस्त? ३ घरगुती टिप्स वापरा, कबुतरं पुन्हा फिरकणारच नाही

How to Get Rid of Pigeons Naturally: कबुतरांच्या कलकलाट आणि विष्ठेमुळे हैराण झाला असाल तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा.

Bhagyashree Kamble

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी राहणाऱ्यांसाठी कबुतरांचा त्रास ही रोजची समस्या बनली आहे. काहींना कबुतरं आवडतात, तर काहींना कबुतरांचा त्रास होतो. पंखांचा आवाज, विष्ठा यामुळे बाल्कनी आणि खिडक्या खराब होतात. तसेच कबुतरांच्या विष्ठेमुळे रोगराई देखील पसरते. गर्दीच्या शहराक कबुतरं सर्वत्र दिसतात. जर घराच्या भोवती कबुतरं फिरकू नये, असं वाटत असेल तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. कबुतर पुन्हा फिरकणार नाही. त्यांना इजा न करता या टिप्स फॉलो करून पाहा.

चमकदार वस्तूंचा वापर

कबुतरांना चमकदार वस्तूंची भीती वाटते. चमकदार वस्तूंमुळे घराबाहेर कबुतरं पुन्हा फिरकत नाहीत. यासाठी आपण काही घरातल्या वापरात नसलेल्या वस्तूंचा वापर करू शकता. घरातील जुन्या सीडी, अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करा. या गोष्टी खिडकीबाहेर लटकवा. याचा वापर करून आपण कबुतरांना पळवून लावू शकता.

शिकारी पक्ष्यांच्या आकृत्या खिडकीबाहेर ठेवा

कितीही पळवून लावलं तर, कबुतर पुन्हा खिडकीबाहेर येत असतील तर, शिकारी पक्षांच्या आकृत्यांचा वापर करून पाहा. गरूड किंवा घुबड या शिकारी पक्षांच्या प्लास्टिकच्या खेळणी खिडकीबाहेर लटकवा. कबुतर पुन्हा खिडकीबाहेर फिरकणार नाही.

तिखट मसाल्यांचा वापर करा

लिंबू, व्हिनेगर, कापूर, लसूण किंवा लाल मिरची या मसाल्यांचा वास कबुतरांना सहन होत नाही. आपण या मसाल्यांचा वापर करून कबुतरांना पळवून लावू शकता. व्हिनेगर किंवा लिंबाच्या रसात भिजवलेला कापडाचा तुकडा बाल्कनीच्या कडेला बांधा. या उपायामुळे कबुतर पळ काढतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आज सुट्टी

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळणार; जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

NCP Merger: अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल, मगच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शरद पवारांच्या आमदारांचं मोठं विधान

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? इराणवर होणार विध्वसंक हल्ला?

Success Story: वडील भांडी विकायचे, लेकीने नोकरी करत केली UPSC पास; IAS नमामि बन्सल यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT