Shukra Gochar 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar 2023 : सिंह राशीत शुक्र ग्रहाचे गोचर ! या राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर, करिअरला लागेल ब्रेक

Shukra In Kundali : सध्या शुक्र हा कर्क राशीत असून ७ जुलैला तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

कोमल दामुद्रे

Shukra Che Rashi Parivartan : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेनुसार त्याची दिशा बदलत असतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे अनेक राशींवर त्याचा परिणामही पाहायला मिळतो. शुक्र ग्रहाला ऐश्वर्य व भौतिक सुखाचा कारक मानले जाते.

सध्या शुक्र हा कर्क राशीत असून ७ जुलैला तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांसाठी येणारा महिना खूप कठीण जाणार आहे. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागू शकते. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत

1. वृश्चिक

या राशीच्या लोकांना जवळच्या व्यक्तीपासून थोडे सावध राहावे लागणार आहे. तुमचा विश्वासघातही होऊ शकतो. आरोग्याची (Health) काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कुठेही गुंतवणूक (Investment) करणे टाळा.

2. मकर

या राशींना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहे. व्यवसाय-धंद्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. सिक्रेट सांगताना थोडी सावधगिरी बाळगा. कर्ज (Loan) किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचार सध्या करु नका.

3. मीन

मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर अशुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. प्रेमसंबंधात अडचणी येऊ शकतात. शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. अचानक खर्च वाढू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT