माधव सावरगावे, संभाजीनगर प्रतिनिधी
मोबाइलचे व्यसन म्हटले की डोळ्यांसमोर येतात ती लहान मुले आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई. मात्र, आता या डिजिटल व्यसनाने ज्येष्ठ नागरिकांनाही विळखा घातल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नुकतंच 75 वर्षाय वयोवृद्ध महिला इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याच्या इतक्या आहारी गेल्या की, त्यांना भूक, तहान, दैनंदिन व्यवहारांचेही भान राहिले नाही. कुटुंबीयांनी मोबाइल काढून घेतल्यानंतर त्यांनी आदळआपट केली. अखेर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १५ दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
रिल्स पाहण्याची सवय नेमकी लागली कशी?
आजीबाईंना इन्स्टाग्रामवरील रील्स पाहण्याची सवय लागली होती. सुरुवातीला मनोरंजनासाठी सुरू झालेला हा प्रकार हळूहळू व्यसनात बदलला. तासन् तास मोबाइलवर रील्स पाहण्यात त्यांचा वेळ जाऊ लागला. मोबाइल हातात असेल, तर जेवणाची वेळ झाली, तहान लागली, याचेही त्यांना भान राहत नव्हते. कुटुंबीयांनी मोबाइलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल काढून घेताच त्या अस्वस्थ होत आणि आदळआपट करीत. परिस्थिती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना एका रुग्णालयात दाखल केले.
रूग्णालयात काय काय घडलं?
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच एक अनपेक्षित प्रकार घडला. ५ रुग्णांचे मोबाइल अचानक गायब झाले. रुग्णालयात यापूर्वी अशा प्रकारे मोबाइल गायब होण्याची घटना घडली नव्हती. त्यामुळे मोबाइल नेमके गेले कुठे, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा संबंधित आजीबाईंनी पाच रुग्णांचे मोबाइल स्वतःच्या पिशवीत ठेवल्याचे समोर आले. मोबाइलचे आकर्षण किती तीव्र झाले होते, याची जाणीव या घटनेतून झाली. आजीबाईवर सुमारे १५ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना नुकतीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.