5 Detox Drink For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 5 डिटॉक्स ड्रिंक्स, घरी बनवण्याची रेसिपी सोपी

Manasvi Choudhary

वजन नियंत्रणात ठेवणे

निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नसून तुम्ही दिवसभरात काय खाता-पिता हे देखील महत्त्वाचे असते.

weight loss | pinterest

डिटॉक्स ड्रिंक्स

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर दिवसाची सुरुवात डिटॉक्स ड्रिंक्स पिऊन करा. सकाळी रिकाम्यापोटी डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने शरीराची चयापचय क्रिया वेगवान होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

5 Detox Drink For Weight Loss | pintrest

वजन कमी करण्यासाठी 5 ड्रिंक्स कोणते?

वजन कमी करण्यासाठी सकाळी कोणते ५ डिटॉक्स ड्रिंक्स प्यावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

5 Detox Drink For Weight Loss

ओव्याचे पाणी

ओवा पचनसंस्थेसाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. रात्रभर एक चमचा ओवा पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी थोडे कोमट करून गाळून प्या. यामुळे गॅस, अपचन दूर होते आणि मेटाबॉलिझम सुधारून वजन कमी होण्यास मदत होते.

Ajwain Water

लिंबू पाणी

कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून सकाळी रिकाम्यापोटी पिणे हा वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि जुना उपाय आहे. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील चरबी विरघळवण्यास मदत करतात.

Warm Lemon Water

हळदीचे पाणी

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' (नावाचा औषधी घटक असतो, जो शरीरातील सूज कमी करतो आणि चरबी साठण्यापासून रोखतो. कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व वजन नियंत्रणात राहते.

Turmeric Water | Canva

दालचिनी पाणी

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि चयापचय क्रिया वाढवण्यासाठी मदत करते. दालचिनीचा छोटा तुकडा रात्री पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

Cinnamon Water

मेथीच्या दाण्याचे पाणी

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. रात्री १ चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, अनावश्यक भूक लागत नाही आणि वजन झपाट्याने कमी होते.

Fenugreek / Methi Water

NEXT: Ginger And Turmeric Drink: सकाळी आलं आणि हळदीचे पाणी प्यायल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Ginger And Turmeric Drink | Saam Tv
येथे क्लिक करा...