Share Market Latest Updates | Sensex News Saam Tv
लाईफस्टाईल

Share Market : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, सेन्सेक्स 200 अंकानी घसरला

शेअर मार्केटची सुरुवात घसरणीसह झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेअर मार्केटची (Share Market) सुरुवात घसरणीसह झाली आहे. आंतरराष्ट्रीय (International) आणि आशियाई मार्केटमध्ये संमिश्र ट्रेंड दिसून आला आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये आज देखील विक्री सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. आज शेअर मार्केटमध्ये व्यवहाराला सुरुवात झाली. तेव्हा सेन्सेक्स (Sensex) फक्त ५ अंकांनी वधारला होता. निफ्टी ३ अंकानी वधारत होता १७,१२० अंकावर सुरू झाला आहे. यानंतर मात्र, घसरण सुरू झाली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये १८९ अंकांनी तर निफ्टी ५१ अंकांनी घसरला आहे. (Share Market Sensex plunges 200 points)

हे देखील पहा-

प्री-ओपनिंगमध्ये शेअर मार्केट फारशी हालचाल दिसली नाही. सेन्सेक्स ५ अंकांनी वधारत ५७,२९७ अंकांवर सुरू झाला आहे. निफ्टी (Nifty) २.८० अंकांनी वधारला आहे. आज आयटी, मीडिया, मेटल, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरशिवाय इतर क्षेत्रामध्ये विक्रीचा सपाटा सुरू आहे. टाटा स्टील १.७ टक्क्यांनी वधारला आहे. तर, बीपीसीएल १.६१ टक्के, हिंदाल्को १.५७ टक्क्यांच्या वाढीबरोबरच वधारला देखील आहे.

एचयूएल २.३४ टक्के, एशियन (Asian) पेंट्स १.६८ टक्के, नेस्लेमध्ये १.६ टक्क्यांची घसरण होताना दिसून येत आहे. सोमवारी, शेअर मार्केटमध्ये सुरू झाल्यानंतर काहीसे आशादायक चित्र असताना परत एकदा अस्थिरता दिसून आली आहे. शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स ५६१ अंकांनी तर, निफ्टी १६८ अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये ०.९७ टक्क्यांची घसरण होऊन तो ५७,३०२ वर येऊन पोहोचला आहे. निफ्टीमध्ये ०.९७ टक्क्यांची घसरण होऊन तो १७,११८ वर पोहोचला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT