Navratri 2023 Special Recipe Saam tv
लाईफस्टाईल

Navratri 2023 Special Recipe : साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ, नवरात्री स्पेशल रेसिपी पाहा

कोमल दामुद्रे

Upvasache Sabudana Thalipeeth :

अवघ्या काही दिवसात नवरात्री उत्सव सुरु होईल. ही नवरात्री दुर्गा देवीला समर्पित असून या दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यंदा ही नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

नवरात्रीच्या काळात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. उपवास करणे आरोग्याला फायदेशीर मानले जाते. उपवासाच्या काळात वेगवेगळे पदार्थ चाखले जातात. पण तुम्हालाही तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर साबुदाण्यापासून तयार करा कुरकुरीत थालीपीठ.

1. साहित्य | Ingredients

  • साबुदाणा १/२ कप | Sabudana ½ cup

  • वरई/भगर १/२ कप | Varai / Bhagar ½ cup

  • किसलेला बटाटा १ मोठा | Grated Potato 1 big

  • हिरव्या मिरचीचा ठेचा १ छोटा चमचा | Green Chilly Chutney 1 tsp

  • जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp

  • बारीक चिरलेली कोथिंबीर १/४ कप | Finely Chopped Fresh Coriander ¼ cup

  • दाण्याचा जाडसर कूट १/४ कप | Peanut Crushed Powder ¼ cup

  • सैंधव मीठ | Himalayan Pink Salt

  • शेंगदाणा तेल/ साजूक तूप गरजेप्रमाणे

2. कृती

  • सर्वप्रथम साबुदाण्याची पावडर तयार करुन घ्या. नंतर भगरीची पावडर तयार करा. दोन्ही पीठ मिक्स करा.

  • तयार पीठात किसलेला बटाटा, जिरे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून पीठ मळून घ्या.

  • तयार पीठाचा गोळा तयार करुन कापडावर थालीपीठ थापून घ्या.

  • गॅसवर तवा ठेवून थालीपीठ चांगले भाजा. १० मिनिटात तयार होईल उपवासाचे थालीपीठ.

  • दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा गरमागरम थालीपीठ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT