Shardiya Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023: शारदीय नवरात्रीत जवाचे धान्य का पेरले जाते? जाणून घ्या महत्त्व

Ghatasthapana Ghat Vidhi 2023 : घटस्थापनेला घट का बसवला जातो. यामध्ये धान्याची पेरणी का केली जाते?

कोमल दामुद्रे

Navratri Festival 2023 :

शारदीय नवरात्रौत्सव लवकरच सुरु होणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रौत्सव सुरु होतो. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून ते २४ ऑक्टोबरपर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे.

नवरात्रीच्या या नऊ दिवसात दूर्गा देवीची (Durga Devi) विशेष पूजा केली जाते. देशभरात हे नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. या दिवशी घरोघरी घट देखील बसवला जातो. परंतु, घटस्थापनेला घट का बसवला जातो. यामध्ये धान्याची पेरणी का केली जाते? जाणून घेऊया यामागचे कारण

घटस्थापना (Ghatasthapana) करताना सात प्रकारच्या धान्यांची पेरणी केली जाते. याला सप्तधान्य म्हणून ओळखले जाते.या सप्तधान्यात प्रामुख्याने जव, तीळ, धान, मूग, बाजरी, चणे, गहू यांचा समावेश असतो. शास्त्रानुसार धान्य हे ब्रम्हदेवाचे स्वरुप मानले जाते. असे म्हटले जाते की, जर धान्याचे अंकुर २ ते ३ दिवसात आले तर ते अतिशय शुभ मानले जाते.

तसेच नवरात्रीत (Navratri) विड्याच्या पानाला देखील अधिक महत्त्व आहे. कलशात विड्याचे पान आणि नारळ ठेवल्यानंतर घटस्थापनेला पूर्णत्व प्राप्त होते. असे म्हटले जाते की, सप्तधान्यात जवाला अधिक महत्त्व आहे. हिरवे जव समृद्धी, शांतता आणि प्रगतीचे प्रतीक मानले गेले आहे.

1. जवाची पेरणी का केली जाते?

जव हे ब्रम्हदेवाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक कथेनुसार ब्रह्माने विश्व निर्माण केले तेव्हा वनस्पतीमध्ये पहिले पीक हे 'जव' होते. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या वेळी प्रथम जवाची पूजा केली जाते. जव हे विश्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून जेव्हा जेव्हा देव-देवातांची पूजा केली जाते तेव्हा जव अर्पण केले जाते. अनेक धार्मिक कार्यात होम-हवनात जवाचा प्रामुख्याने वापर देखील केला जातो.

कलश स्थापनेदरम्यान पेरलेले जव दोन-तीन दिवसांत उगवते, पण ती उगवली नाही तर भविष्यात ते शुभ लक्षण मानले जात नाही.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT