Shardiya Navratri 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2025: नवरात्रीची दुसरी माळ, माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या

Mata Brahmacharini Puja: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. या पूजेने भक्तामध्ये संयम, ज्ञान आणि आत्मविश्वास निर्माण होतो. योग्य पद्धतीने पूजा करण्याची माहिती जाणून घ्या.

Manasvi Choudhary

शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. दुसरा दिवस ब्रम्हचारिणी देवीला समर्पित आहे असे मानले जाते. या दिवशी मनोभावे पूजा केल्याने तुम्हाला फायदा होईल.

आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेच्या ब्रम्हचारिणी रूपाची पूजा केली जाते. ब्रह्म शब्दाचा अर्थ तपश्चर्या आणि ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारा. ब्रह्मचारिणी देवीची आराधना म्हणजे व्यक्तीला त्याच्या सर्व कार्यात विजय प्राप्त होतो. हे रूप भक्ती, तपस्या आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. पुराणानुसार, भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी पार्वती यांनी तपस्या केली होती. या तपश्र्चर्येच्या स्मरणार्थ ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. या दिवशी भक्तामध्ये संयम आणि ऊर्जा प्रेरित होते.

पूजा करण्याची पद्धत-

१) सूर्योदयानंतर स्नार करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. पूजास्थळी आसनावर बसून प्रतिज्ञा करा.

२) देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि ओम ब्रम्हचारिणीये नम:या मंत्राचा जप करा.

३) देवीला लाल वस्त्र, चंदन, कुंकू आणि फुले अर्पण करा.

४) ब्रम्हचारिणी देवीला गंगाजलात मिसळलेला साखरेचा प्रसाद नैवेद्य दाखवा यामुळे मनावर संयम आणि ज्ञान प्राप्त होते.

५) याशिवाय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला पांढरी फुले अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

SCROLL FOR NEXT