Investment Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Investment Tips : फक्त बचत खात्यात पैसे ठेवण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी हे अनेक पर्याय फायदेशीर, जाणून घ्या

These Scheme Gives High Return : आजकाल बहुतांश लोकांकडे बचत खाती आहेत. या खात्यांद्वारे तुम्ही अनेक प्रकारचे व्यवहार करू शकता.

Shraddha Thik

Investment Tips :

आजकाल बहुतांश लोकांकडे बचत खाती आहेत. या खात्यांद्वारे तुम्ही अनेक प्रकारचे व्यवहार करू शकता. याशिवाय, खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला वेळोवेळी व्याजही मिळते. पण बचत खात्यात जास्त पैसे ठेवणे योग्य आहे का?

बहुतेक आर्थिक तज्ज्ञ हे योग्य मानत नाहीत कारण त्यात तुम्हाला फार जास्त परतावा मिळत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे रेपो दर वेळोवेळी बदलत राहतो आणि याचा थेट परिणाम (Effects) बचत खात्यावर होऊ शकतो.

कमी व्यजदर

सेव्हिंग खात्यात पैसे (Money) ठेवले तर बदल्यात जास्त परतावा मिळेल या विचाराने लोक आपले सर्व पैसे बचत खात्यात ठेवतात पण असे होत नाही; कारण बँका बचत खात्यांवर दरवर्षी 3.5-4 टक्क्यांपेक्षा कमी व्याजदर देतात.

आर्थिक सुरक्षेसाठी, लोकांना त्यांची संपूर्ण कमाई बचत (Saving) खात्यांमध्ये ठेवणे आवडते जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम पत्करावी लागणार नाही. इतकेच नाही तर बरेच लोक बचत खात्यात गुंतवणूक करतात कारण ते Emergency करण्यासाठी वापरले जाते आणि ही जमा केलेली रक्कम Emergency Money म्हणून काम करू शकते.

बचत खात्याऐवजी येथे गुंतवणूक करा

जर तुम्हाला तुमचे पैसे बचत खात्यात गुंतवायचे नसतील तर तुम्ही खालील पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण या सर्व दीर्घकालीन योजना आहेत यातून आपल्याला चांगला परतावा मिळवू शकतो.

1. सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी, तुम्ही Fixed Diposit निवडू शकता कारण ते बचत खात्यांच्या तुलनेत जास्त व्याजदर देते.

2. Mutual Fundsमध्ये गुंतवणूक हा दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्मच्या योजनांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

3. याशिवाय तुम्ही सोन्यातही गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करू शकता किंवा तुम्ही डिजिटल सोन्यातही गुंतवणूक करू शकता. भविष्यात तुम्हाला यातून चांगले पैसै परत मिळतील.

4. या सर्वांशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम, पब्लिक प्रॉव्हिडंट, गव्हर्नमेंट बाँड्स आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स सारख्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता कारण ते बचत खात्यांपेक्षा जास्त परतावा देतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT