Sarva Pitri Amavasya 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Sarva Pitri Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या कधी? पितरांचे श्राद्ध का केले जाते? जाणून घ्या

Sarva Pitri Amavasya : दरवर्षी सर्वपित्री अमावस्या भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते.

Shraddha Thik

Importance Sarva Pitri Amavasya :

दरवर्षी सर्वपित्री अमावस्या भाद्रपद महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते. याला भाद्रपद अमावस्या तसेच मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. पितृ पक्षात सर्वपित्री अमावस्येची तिथी अत्यंत महत्त्वाची आहे.

ही शेवटची तिथी (Tithi) असल्याने त्या दिवशी सर्व माहिती असलेल्या-नसलेल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण, पिंड दान इ. केले जाते. यंदा सर्वपित्री अमाव्यसा 14 ऑक्टोबर, शनिवारी आहे. तसेच वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण याच दिवशी होणार आहे.

सर्वपित्री अमावस्या कधी असते?

अमावस्या तिथी - यावर्षी भाद्रपद अमावस्या शुक्रवारी, 13 ऑक्टोबर रोजी रात्री 09.50 वाजता सुरू होणार आहे.

अमावस्या तिथी समाप्ती - शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11.24 वाजता समाप्त होईल.

सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांना निरोप

सर्वपित्री अमावस्या तिथीला सकाळी (Morning) स्नान करावे. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देणे महत्त्वाचे असते. तसेच तेथे पितरांना पाणी, तीळ आणि पांढरी फुले अर्पण करावी. तर्पण करताना कुशाचा पवित्र धागा धारण करावा. त्यानंतर पितरांना संतुष्ट करण्यासाठी पांढरे वस्त्र, तांदूळ, फळे, पैसा इत्यादी दान करावे.

सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व काय आहे?

पितृ पक्षाच्या सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व (Importance) आहे. कारण या दिवशी तुम्ही सर्व पितरांचे श्राद्ध, तर्पण इत्यादी करू शकता. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची माहिती नसेल आणि कोणाची मृत्यू तारीख माहित नसेल, तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही तर्पण, पिंड दान, ब्राह्मण पर्व, पंचबली कर्म, श्राद्ध इत्यादी करू शकता. या दिवशी तुम्हाला पितृ दोष असेल तर त्याचेही श्राद्ध करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT