Sankashti Chaturthi  Saam Tv
लाईफस्टाईल

Sankashti Chaturthi 2023 : चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला असे करा श्रीगणेशाला प्रसन्न, रखडलेली कामे लागतील मार्गी

Sankashti Chaturthi Upay In Marathi : संकष्ट चतुर्थी चातुर्मासात आल्यामुळे तिला चातुर्मासातील संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते.

कोमल दामुद्रे

Sankashti Chaturthi July 2023 : आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास प्रारंभ होतो. त्यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. यंदा ही संकष्ट चतुर्थी चातुर्मासात आल्यामुळे तिला चातुर्मासातील संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते.

आज ६ जुलैला संकष्ट चतुर्थी आहे. जर आज पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वकरित्या श्रीगणेशाची आराधना केल्याने बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. तसेच करिअरमधील अनेक अडथळे दूर होतात. कामात दिवसेंदिवस प्रगती होते. आयुष्यात सुख-समृद्धी येते.

तसेच आजच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतील. यासोबतच श्रीगणेश समृद्धी, बुद्धिमत्ता, सुख-शांती, करिअरमध्ये (Career) वृद्धी देईल. संकष्टी चतुर्थीला चंद्राला अर्घ्य अर्पण करणे महत्वाचे आहे. असे केल्याने कुंडलीतील (Kundali) चंद्राची स्थितीही मजबूत होते. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीला गणपतीला प्रसन्न करण्यासाठी काय करायला हवे ते.

1. संकष्ट चतुर्थी तिथी

पंचागानुसार कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवारी ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. तर समाप्ती मध्यरात्री ३ वाजून १२ मिनिटांनी आहे. परंतु, भारतीय पंचागानुसार (Panchang) सूर्योदयाची तिथी ही ६ जुलै रोजी असणार आहे. त्यासाठी चंद्रोदयाची वेळ (Time) ही सायंकाळी १० वाजून १२ मिनिटांनी संपेल.

2. संकष्टी चतुर्थीचे उपाय

1. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला 21 दुर्वांसह शमीची पाने अर्पण करा. असे केल्याने श्रीगणेश सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि भरपूर सुख-समृद्धी देतील.

2. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला हळदीत चंदन मिसळून अर्पण करा. यानंतर शमीच्या झाडाची पूजा करावी. असे केल्याने जीवनातील (Life) दु:ख, वेदना, दु:ख दूर होतात.

3. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला चार मोदक किंवा लाडू अर्पण करा. यापैकी एक मोदक गणेशासमोर ठेवा, दुसरा गणेश मंदिरात ठेवा, तिसरा मोदक लहान मुलाला द्या आणि चौथा मोदक किंवा लाडू स्वतः खा. असे केल्याने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असते.

4. गणपतीला जास्वंदाची फुल अर्पण करा. यानंतर 11 दूर्वा अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT