Salary Latest News SAAM TV
लाईफस्टाईल

Salary Saving Tips: महिन्याचा पगार पुरत नाहीये? तर अशा पद्धतीने करा पैशांची बचत

खर्च आणि अनावश्यक खर्च यातील फरक समजून घेतल्यावर त्यांना बचतीचा खरा अर्थ समजेल. आता जाणून घेऊयात पगारातून बचत कशी करायची.

Vishal Gangurde

Salary Saving Tips News: देशात काही जणांना भरमसाठ पगार असतो. त्यांना पगार असूनही त्यांची बँकेत बचत होत नाही. चांगला पगार असूनही बचत न होण्यामागे अनेक कारणे आहेत. खर्च आणि अनावश्यक खर्च यातील फरक समजून घेतल्यावर त्यांना बचतीचा खरा अर्थ समजेल. आता जाणून घेऊयात पगारातून बचत कशी करायची. (Latest Marathi News)

पगार वाढल्यानंतर लोकांच्या खर्चातही वाढ होते. पगारवाढीमुळे अनेकांच्या जीवनशैलीतही बराच फरक पाहायला मिळतो. जेव्हा पगार कमी होता, तेव्हा खिसाही रिकामा असायचा. तर पगारवाढीनंतर अनेक जण बचत करण्यास असमर्थ ठरतात.

पगार चांगला असूनही बचत होत नसेल तर खर्च आणि अनावश्यक खर्च म्हणजे काय समजून घ्यावे लागेल. एका व्यक्तीसाठी असणारा अनावश्यक खर्च हा दुसऱ्या व्यक्तीसाठी आवश्यक खर्चही असू शकतो. यासाठी खर्चाची दोन भागात विभागणी करावी लागेल. एका अनुमानानुसार, लोक पगारातून १० ते २० टक्के रुपये खर्च हे अनावश्यक खर्च करत असतात.

सामान्यपणे, मासिक एक लाख रुपये कमाई करणारा व्यक्ती महिन्याला १०००० रुपये अनावश्यक खर्च करतो. या खर्चावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. हा अनावश्यक खर्च १० ते २० टक्के असतो. हा अनावश्यक खर्च आपण या पद्धतीने टाळू शकतो.

1. खर्चासाठी पद्धतशीर धोरण तयार करा

महिन्याच्या कमाईचं योग्य नियोजन करा. नियोजन केल्यास तुम्ही तुमचे पैसे अतिशय पद्धतशीरपणे खर्च करू शकाल. या सर्व कमाईच्या खर्चाची नोंद ठेवा. तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणू शकता.

2. अनावश्यक खर्च करणे टाळा

आपल्यापैकी अनेकांना अनावश्यक खर्च करण्याची सवय असते. अनेक जण अनावश्यक बाबींवर खर्च करत असतात.

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चावर बंधन ठेवावा. तुमचा अनावश्यक खर्च तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवू शकता.

3. पगाराच्या 30 टक्के बचत करा

तुमच्या पगारातील 30 टक्के बचत करण्याचा प्रयत्न करा. हे बचतीचे पैसे तुम्ही एफडी, म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवू शकता. हा पैसा तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी काम करेल.

4. खरेदीला तुमचा छंद बनवणे टाळा

खरेदीला तुमचा छंद बनवणे टाळावे. अनेकदा लोक शॉपिंगला त्यांच्या सवयीचा भाग बनवतात. अशा परिस्थितीत ते अनावश्यक वस्तूही महागड्या किमतीत खरेदी करू लागतात. अशा परिस्थितीत खूप पैसा वाया जातो. या कारणास्तव, आपण खरेदीला आपला छंद बनविणे टाळले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT