Russia’s FMBA announces breakthrough mRNA cancer vaccine showing 100% success in pre-clinical trials, raising hope for millions of patients worldwide. Saam Tv
लाईफस्टाईल

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Cancer Patients May Soon Get Relief: जगातला सर्वात भीतीदायक आणि धोकादायक आजार म्हणजे कॅन्सर...कॅन्सरचं नाव घेतलं तरी अंगाला शहारे येतात...मात्र याच आजारापासून आता मुक्ती मिळणार आहे...होय तुम्ही ऐकलंय ते खरंय.....कॅन्सरवर लसीची निर्मिती करण्यात आलीय.. ही यशस्वी लस कोणी शोधली? भारतात कधी येणार?

Suprim Maskar

कॅन्सर म्हटलंच की अनेकांना धडकी भरते. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सर ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मात्र आता कॅन्सरवर मात करणं सहजशक्य होणार आहे...जवळपास 8 महिन्यांपूर्वी कॅन्सरवर मात करणाऱ्या लसीवर रशिया संशोधन करत असल्याची माहिती जगभरात व्हायरल झाली होती. त्यानंतर आता याचं लशीची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे... प्री क्लिनिकल ट्रायल्समध्ये या लसीच्या चाचणीला 100 टक्के यश मिळालयं.. त्यामुळे कॅन्सरवर मात करण्यासाठी रुग्णांना या लसीचा फायदा होणार आहे...

जगभऱातल्या कॅन्सरग्रस्तांसाठी महत्वाची बातमी... अत्यंत दुर्धर अशा कॅन्सरवर आता मात करण शक्य होणार...कारण संशोधकांनी एक लस विकसित केलीय जिच्यामुळे

रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजी एजन्सीकडून अनेक वर्षांपासून mRNA लसीवर संशोधन सुरु होते. या लसीसंदर्भात ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत FMBAच्या प्रमुख वेरोनिका स्कवोर्सोवा यांनी माहिती दिलीय. गेल्या तीन वर्षांपासून लसीची प्रीक्लिनिकल चाचणी चालू होती. कोलोरेक्टल कर्करोगावरील उपचारासाठी ही लस उपयुक्त ठरणार आहे. तसचं या लसीचा दुसरा प्रकार मेंदूच्या आणि त्वचेच्या कर्करोगावर प्रभावी ठरेल. प्रीक्लिनिकल चाचणीत कर्करोगाच्या 60 ते 80 % प्रकरणांमध्ये ट्यूमरचा आकार कमी होताना दिसून आला. मात्र ही लस वापरासाठी तयार असली तरी लसीला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.रशिया ही लस आपल्या देशात मोफत देणार असली तरी ही लस 2 लाख 50 हजार रुपयांना उपलब्ध होऊ शकेल.

भारताही कॅन्सर रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. भारतातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे..

2024 मध्ये ICMR च्या अहवालानुसार, 15 लाख 62 हजार 99 रुग्णांना कॅन्सरचं निदान झालं होतं.

त्यापैकी अंदाजे 8 लाख 74 हजार 404 रुग्णांचा मृत्यू झालाय.

त्यात फुफ्फुसांच्या कॅन्सर रुग्णांची संख्या 74 हजार 763 आहे. तर ब्रेस्ट कॅन्सरची रुग्णसंख्या 2 लाख 38 हजार 85 आहे. त्यातच पुरुष आणि महिलांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं भारतात आढळलयं.

भारतातील कॅन्सर रुग्णांची संख्या पाहता रशियानं तयार केलेल्या लसीची भारतातील रुग्णांनाही निश्चितच फायदा होऊ शकतो. रशिया आणि भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध चांगले आहेत. त्यात भविष्यात कॅन्सरवर मात करण्यासाठी रशियाचा फॉर्म्युला वापरून भारतातच लसीची निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे रशियाची ही लस अधिकृतपणे विक्रीसाठी कधी उपलब्ध होणार? याकडे जगाचंं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT