Running tips for Beginners, Fitness tips
Running tips for Beginners, Fitness tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पहिल्यांदाच धावायला जाताय तर या गोष्टींची काळजी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. यासाठी आपण योग, चालणे किंवा धावणे या गोष्टींना प्राधान्य देतो. दिवसांतून आपण १५ ते २० मिनिटे धावल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.

हे देखील पहा -

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण धावण्याचा पर्याय अवलंबतो परंतु, आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला दुखणे उद्भवते. कधी कधी यामुळे आपले स्नायू दुखू शकतात, हाड फ्रॅक्चर होऊ शकते, पाय मुरगळु शकतो तसेच डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अशावेळी आपण पहिल्यांदा धावायला जात असू तर कोणत्या गोष्टींची अधिक काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.

१. पहिल्यांदा धावायला जात असू तेव्हा आपण अशा शूज ची निवड करायला हवी ज्यामुळे आपल्याला धावताना कोणती समस्या येणार नाही. शूज अधिक घट्ट किंवा सैल नसावेत. यामुळे आपल्या पायाला कोणतीही दुखापत होणार नाही. त्यासोबतच आपण शॉर्टस आणि टी-शटची ही खरेदी करु शकतो.

२. धावण्याच्या आधी आपण आपल्या शरीराला तयार करायला हवे. धावण्यापूर्वी आपण वॉर्म अप करणे गरजेचे आहे. यामुळे शरीराला गती प्राप्त होते व आपले पायही दुखत नाही.

३. बरेच लोक सुरुवातीला धावत असतात मग धाप लागल्यानंतर त्यांना पुन्हा धावता येत नाही यासाठी अधेमधे चालायला हवे त्यामुळे पायावर ताण कमी पडेल. गुडघे किंवा टाचा अधिक त्रास देणार नाही. धावणे आणि चालणे अशा दोन्ही क्रिया आपण करायला हव्या.

४. धावताना आपण आपल्या शरीराची (Health) स्थिती देखील पाहायला हवी. आपल्या शरीराची स्थिती एकदम सरळ असायला हवी. तसेच धावताना आपले लक्ष जमीनवर असायला हवे.

५. धावताना शरीरातून भरपूर घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व आपल्याला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. धावताना शक्यतो पाणी (Water) पिणे टाळा त्यामुळे आपल्या पोटात दुखू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT