Royal Enfield 750cc Price in India Saam Tv
लाईफस्टाईल

Royal Enfield 750cc Bike: जबरदस्त आणि पॉवरफुल! येत आहे रॉयल एनफील्डची पहिली 750cc इंजिन बाईक

साम टिव्ही ब्युरो

Royal Enfield 750cc Price in India: रॉयल एनफील्ड ही जगातील सर्वात मोठी मध्यम आकाराची बाईक उत्पादक कंपनी आहे, जी सतत स्वत:ला वाढवण्यासाठी काम करत आहे. कंपनी 2025 मध्ये 750cc स्पेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.

अनेक जाणकारांच्या मते कंपनीने यावर काम सुरू केले आहे. कंपनी एक नवीन प्लॅटफॉर्म विकसित करत आहे, कोडनेम R, जे बहुधा 750cc इंजिन बाईकसाठी विकसित केले जात आहे.

Royal Enfield Upcoming Bikes 2023: 750cc बॉबर बाईक

या प्रोजेक्टचे कोडनेम R2G आहे. ही 750cc बॉबर बाईक आहे. जी भारत, उत्तर अमेरिका, युरोप आणि युनायटेड किंग्डमसह विविध बाजारपेठांमधून महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया घेतल्यानंतर विकसित केली जात आहे. रॉयल एनफील्डच्या पोर्टफोलिओमधील ही सर्वात मोठी बाईक असण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सध्याचा पोर्टफोलिओ 350cc ते 650cc बाईक

कंपनी भविष्यात 350cc ते 750cc रेंजमध्ये अनेक बाईक लॉन्च करू शकते. कंपनीकडे सध्या 350cc ते 650cc पर्यंतच्या बाईक्सचा पोर्टफोलिओ आहे.

कंपनीची भविष्यातील योजना काय आहे?

सूत्रांचे म्हणणे आहे की, 750cc मिल ही ट्विन-सिलेंडर 650cc इंजिनचे एक रेपेटिशन आहे. जी उत्तर अमेरिका आणि युरोप सारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी खास तयार केली गेली आहे. जिथे बाईक मोठ्या आकाराच्या प्रीमियम मोटरसायकलमध्ये ठेवली जाऊ शकते.

सूत्रांचे म्हणणे आहे की, कंपनी येत्या काही दिवसांत 350cc, 450cc, 650cc आणि 750cc चे अनेक मॉडेल्स सादर करेल. ज्यामध्ये Bobber 750 पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय इतर अनेक पर्यायांचाही विचार सुरू आहे. (Latest Auto News in Marathi)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT