Skin Care Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Skin Care Tips : 'एसी'मुळे तुमचीही त्वचा कोरडी होते? तर 'या' घरगुती टिप्स आजपासूनच फॉलो करा

Skin Care Tips: त्वचा डिहायड्रेट होते, हे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्यासोबतच नियमित टोनर लावणे देखील महत्त्वाचे आहे.

साम टिव्ही ब्युरो

आजकाल आपण सर्वच जण अधिक काळ कामामुळे एसीमध्ये असतो. तर काहींच्या घरी एसी २४ तास चालू असतो. एसीमुळे आपल्याला गर्मीत थंडावा तर मिळतो पण आपल्या त्वचेचे मात्र नुकसान होते. त्वेचेच्या आरोग्यासाठी जास्त थंडावा चांगला नसतो. यामुळे आपली त्वचा लवकर कोरडी पडते आणि त्वचेसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

तासनतास एसीमध्ये बसल्यावर त्वचा कोरडी होते. त्यामुळे आपली त्वचा नैसर्गिक ओलावा गमावेत. एसीमुळे वयाच्या आधीच त्वचेला वृद्धत्व येते. त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. त्वचा डिहायड्रेट होते, हे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्यासोबतच नियमित टोनर लावणे देखील महत्त्वाचे आहे.

फेस मिस्ट

फेस मिस्ट कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी उत्तम आहे. यामुळे त्वचेचे आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. तसेच त्वचा तजेलदार होते. तुम्ही फक्त तीन गोष्टींनी घरगुती फेस मिस्ट बनवू शकता.

फेस मिस्ट बनवण्यासाठी लागणारे घटक

वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या

पाणी

ग्लिसरीन

फेस मिस्ट बनवण्याची कृती

एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या टाका आणि त्यानंतर अर्धी बॉटल ग्लिसरीन तर अर्धी बॉटल पाण्याने भरून नीट ढवळून घ्या. तुमचे फेस मिस्ट झटपट तयार झाले. हे फेस मिस्ट दिवसातून ४ ते ५ वेळा हे फेस मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे करा. त्यामुळे दिवसभर तुमची त्वचा हायड्रेट राहील.

गुलाब-ग्लिसरीन फेस मिस्टचे फायदे

ग्लिसरीनमुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि त्वचा मुलायम होण्यास मदत मिळते. तर गुलाबाच्या पाकळ्या त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT