Jaya Kishori Quotes Saam Tv
लाईफस्टाईल

वैवाहिक जीवनात सुखी राहण्यासाठी Jaya Kishori चे हे विचार लक्षात घ्या, नातं होईल आणखी घट्ट

Motivational Quotes For Married People : पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असलं तरीही त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद आणि भांडणे होतच असतात यात शंका नाही. अनेकवेळा असे घडते की आपण एखाद्याचा राग आपल्या जोडीदारावर काढतो किंवा जेव्हा आपण निराश होतो तेव्हा आपण वाईट वागतो.

Shraddha Thik

Married People :

पती-पत्नीमध्ये कितीही प्रेम असलं तरीही त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून मतभेद आणि भांडणे होतच असतात यात शंका नाही. अनेकवेळा असे घडते की आपण एखाद्याचा राग (Anger) आपल्या जोडीदारावर काढतो किंवा जेव्हा आपण निराश होतो तेव्हा आपण वाईट वागतो.

तरीही हे देखील खरे आहे की जेव्हा आपण आपल्या जोडीदाराशी भांडण करून थकतो तेव्हा आपण लगेच सॉरी (Sorry) म्हणतो. अनेकवेळा, जोडपे त्यांच्या जोडीदाराची माफी मागून संभाषण संपवतात, परंतु नंतर एकमेकांना भांडणाचीही आठवण करून देतात.

मात्र, ही पद्धत अजिबात योग्य नाही. हे प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी म्हणतात. वास्तविक, जया किशोरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने सॉरी म्हणण्याची योग्य वेळ सांगितली आहे.

यादरम्यान जया किशोरी म्हणाल्या की, माफी मागण्यासाठी सॉरी म्हणू नये. कारण यामुळे तुमच्या आणि जोडीदाराच्या नात्यामध्ये काहीही फिक्स होणार नाही. अशा वेळी जेव्हा तुम्हाला आतून वाटेल की तुमच्याकडून चूक झाली आहे, तेव्हा सॉरी म्हणा.

सॉरी कधी म्हणायचे

वाद संपवण्यासाठी लोक एकमेकांना सॉरी म्हणणे ही एक सामान्य समस्या आहे. पण त्यांना तो मुद्दा तरीही डोक्यात राहतो. असे लोक इथेच थांबत नाहीत, तर त्या गोष्टीचा पुढे वापर करतात, जे योग्य नाही.

अशा परिस्थितीत जय किशोरी म्हणतात की, जर तुम्ही त्या व्यक्तीला माफ करू शकत नसाल तर त्याला अजिबात सॉरी म्हणू नका. आत्ता तुमच्या मनात राहून तुम्हाला दुःख होत असेल तर अजिबात सॉरी म्हणू नका. जोपर्यंत गोष्टी चांगल्या होत नाहीत. आधी त्या गोष्टी स्पष्ट करा आणि मग सॉरी म्हणा.

जास्त वाद घालु नका

जर तुम्हाला तुमची चूक खरोखरच कळली असेल तर सर्वप्रथम तुमची चूक मान्य करून माफी मागण्याची तयारी ठेवा. यामुळे तुमच्यामध्ये आणखी गैरसमज निर्माण होणार नाहीत. जोडीदाराशी सर्व गोष्टी स्पष्ट करा आणि लक्षात ठेवा की या काळात तुमच्या दोघांमध्ये हेल्थी चर्चा होईल, जिथे दोघांचाही अहंकार नात्याचा मधे येणार नाही.

एकमेकांना हमी द्या

लोक माफी मागतात, परंतु भांडणाच्या वेळी त्यांनी एकमेकांना सांगितलेल्या चुकीच्या शब्दांबद्दल बोलू नका. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दोघे म्हणत असाल की भांडताना तुम्हाला खूप राग आला आणि तुम्ही तसे करायला नको होते. अशा स्थितीत तुमच्या जोडीदाराला वाटेल की तुम्ही नाते टिकवण्याचा प्रयत्न करत आहात. यादरम्यान, भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही, अशी हमी एकमेकांना द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT