Sleeping Problems Solutions Saam tv
लाईफस्टाईल

Sleeping Problems Solutions : 'हे' 5 पदार्थ खाल्ल्यास तुमचीही झोप उडेल; चुकूनही रात्रीच्या जेवणात खाऊ नका

Remedies For Insomnia : आपण जे काही खातो त्यावरच आपल्या झोपेचं शेड्यूल ठरलेलं असतं. त्यामुळे रात्रीच्या जेवणात काही ठरावीक पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

रात्री १२ वाजून गेले तरी झोप लागत नाही, ही समस्या अनेक व्यक्तींना असते. झोप पूर्ण न झाल्याने आपली दिवसभर चिडचिड होते. त्यामुळे रात्रीची झोप पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही विविध उपाय करत असाल. मात्र तुम्हाला माहीत आहे का? आपण जे काही खातो त्यावरच आपल्या झोपेचं शेड्यूल ठरलेलं असतं. त्यामुळे रात्रीच्या जेवणात काही ठरावीक पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

तळलेले पदार्थ

रात्रीच्या जेवणात तळलेला वडा पाव, कचोरी किंवा समोसा असे तळलेले पदार्थ आहेत ज्याचे सेवन केल्याने तुमची रात्रीची झोप गायब होऊ शकते. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात फॅट असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात याचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो. जेवण पचत नाही आणि आपल्याला झोप लागत नाही.

तिखट जेवण

रात्रीचे जेवण केल्यानंतर आपल्या शरीराची जास्त हालचाल होत नाही. त्यामुळे जास्त तिखट अन्न पचण्यासाठी जड असते. तिखट जेवण करून लगेचच झोपल्याने आपल्याला ऍसीडीटी होते. त्यामुळे छातीत जळजळ वाढते. या समस्या टाळण्यासाठी आपण तिखट जेवण खाणे बंद केलं पाहिजे.

मिठाई

जेवण झाल्यानंतर काही तरी गोड खावं असं अनेकांना वाटतं. त्यामुळे जेवणानंतर अनेक व्यक्ती गुलाबजामून, रसमलाई, रसगुल्ला असे स्विट्स खातात. या स्विट्समध्ये जास्त प्रमाणात साखर असते. साखर आणि चॉकलेट यांचे सेवन केल्याने रात्री झोपल्या झोपल्या लगेचच झोप लागत नाही. अगदी रात्रभर सुद्धा काही व्यक्ती जाग्याच राहतात.

कॉफी

रात्रीच्यावेळी कॉफी पिण्याची सवय फार वाइट आहे. कारण कॉफीमध्ये जास्तप्रमाणात कॅफेन असतं. चहा किंवा कॉफीमधील कॅफेन थेट आपल्या झोपेवर परिणाम करते. त्यामुळे कधीच आहारात रात्रीच्यावेळी कॉफीचे सेवन करून नका. असे केल्याने झोप कमी कमी होत जाते. तसेच काही दिवसांनी तुम्हाला तीव्र डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT