Sarva Pitru Amavasya 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला ही कामे नक्की करा; वर्षभर घरात धनसंपत्ती राहिल

Sarva Pitru Amavasya Tips : पितृपक्षातील शेवटच्या दिवसाला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या दिवशी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गाजेचे असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या पितृपक्षातील दिवस सुरू आहेत. उद्या 2 ऑक्टोबर रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी सर्व प्रकारच्या पितरांची पूजा केली जाते. काही व्यक्तींना पितृ दोष असतो. त्या व्यक्ती देखील या दिवसांमध्ये पूजा करतात. पितृपक्षातील शेवटच्या दिवसाला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या दिवशी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गाजेचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या बद्दल माहिती सांगणार आहोत.

सर्वपित्री अमावस्येला आपण ज्या गोष्टी करचो त्यावर आपंल संपूर्ण वर्ष कसं जाणार हे ठरतं. त्यामुळे या दिवशी सर्व शुभ कामे केली जातात. पुजेवेळी संपूर्ण दिवसभरात सर्वपित्री अमावस्येला काय काय केले पाहिजे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

सायंकाळी दिवा लावा

सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावा. दिवा लावल्यानंतर तेथेच शेजारी नैवेद्याचे ताट ठेवा. यातील अन्न काही पशू पक्षिंना आणि प्राण्यांना खाऊ द्या. याने पुन्य मिळते. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तींचे श्राद्ध केलेले नसते त्या व्यक्ती येथे ठेवलेलं अन्न खातात. तसेच आपल्याला आशिर्वाद देतात.

पितृ स्त्रोताचे पठन करा

सर्वपित्री अमावस्येला आपल्या पुर्वजांचे स्मरन करा. त्यासह पितृ स्त्रोताचे पठन देखील करा. असे केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशिर्वाद देतात. तसेच स्त्रोताचे पठन करताना तुम्ही पुढल्या वर्षी देखील तुमच्या सेवेचा मान आम्हाला द्या असे म्हणा याने देखील पित्र प्रसन्न होतात आणि घरात सुख शांती नांदते.

पितरांच्या नावे झाड लावा

सध्या मानवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे. त्यामुळे दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला पितरांच्या नावाने एकतरी झाड लावा. असे केल्याने पित्र खुश होतात. तसेच त्या घरात कधीही वाईट शक्ती वास करत नाही.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT