Jio New Plans Saam Tv
लाईफस्टाईल

Jio New Plans : जियोने लॉन्च केले 2 नवीन प्री-पेड प्लान, मिळवा 3GB डेटा अन् Netflix फ्री Subscription

Jio Prepaid New Plans : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने नेटफ्लिक्स Subscriptionसह दोन नवीन प्लान सादर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Netflix Free Subscription : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने नेटफ्लिक्स Subscriptionसह दोन नवीन प्लान सादर केल्या आहेत, ज्यांना जिओ-नेटफ्लिक्स प्रीपेड प्लॅन असे नाव देण्यात आले आहे. त्यांची किंमत 1,099 रुपये आणि 1,499 रुपये आहे. 1099 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना प्रतिदिन 2 GB डेटा दिला जाईल.

1,499 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 3 जीबी डेटा (Data) दिला जाईल. दोन्ही प्लानची ​​वैधता 84 दिवसांची आहे. तथापि, निवडक Jio पोस्टपेड आणि Jio Fiber प्लानवर Netflix चे सबस्क्रिप्शन आधीच उपलब्ध आहे. पण प्रीपेड प्लानवर Netflix चे सबस्क्रिप्शन उपलब्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जगात प्रथमच, नेटफ्लिक्स बंडल टेल्को प्रीपेड प्लानसह लॉन्च (Launch) करण्यात आला आहे. या लॉन्चसह, जिओच्या 40 कोटींहून अधिक प्रीपेड ग्राहकांना नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसह प्लान निवडण्याचा पर्याय मिळेल. सर्व लोकप्रिय टीव्ही शो किंवा चित्रपट Netflix वर पाहता येतात. जिओच्या इतर प्लानप्रमाणे दोन्ही प्लान ऑनलाइन किंवा ऑफलाइन रिचार्जद्वारे मिळू शकतात.

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे ​​सीईओ किरण थॉमस म्हणाले, 'आम्ही आमच्या ग्राहकांसाठी जागतिक दर्जाच्या सेवा सुरू करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमच्या प्रीपेड प्लानसह Netflix सादर करणे हे आमच्या ठरावाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.

ग्राहक अनेक उपकरणांवर Netflix अ‍ॅप डाउनलोड (Download) करू शकतात आणि त्याच लॉगिन क्रेडेंशियलसह वापरू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की ते एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर पाहिले जाऊ शकते. 1499 रुपयांच्या प्लानमध्ये नेटफ्लिक्स टीव्ही किंवा लॅपटॉप सारख्या कोणत्याही मोठ्या स्क्रीनवर देखील स्ट्रीम केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT