Jio Cinema OTT Deal  Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Cinema OTT Deal: हॉटस्टार, अमेझॉनला Jio चा दणका ! आता OTT प्लॅटफॉर्मवरील सिरीज आणि चित्रपट पाहाता येणार जिओ सिनेमावर...

Jio Cinema OTT : Reliance Jio - मालकीच्या कंपनीने एक मोठा करार केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Reliance Jio Cinema New Deal : Reliance Jio-मालकीच्या कंपनीने एक मोठा करार केला आहे. जो OTT सेवा प्रदाते Netflix, Amazon आणि Disney Plus Hotstar यांना मोठा धक्का देणार आहे. वास्तविक, Viacom18 ने HBO, Max Originals आणि Warner Bros सोबत अनेक वर्षांचा करार केला आहे.

जिओ वापरकर्ते गेम ऑफ थ्रोन्स आणि हॅरी पॉटर सिरीज (Series), डिस्कव्हरी ऑन जिओ सिनेमा यासारख्या उत्कृष्ट चित्रपट (Movie) आणि शोचा आनंद घेऊ शकतील. हे सर्व चित्रपट आणि शो यापूर्वी हॉटस्टारवर उपलब्ध होते.

हॉटस्टारकडून एवढी मोठी डील हिसकावून घेतल्यावर भारतात (India) हॉटस्टारचे महत्त्व उरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी, वापरकर्ते डिस्ने प्लस हॉटस्टारवर HBO शी संबंधित सामग्री पाहू शकत होते, परंतु कंपनीने (Company) 31 मार्च रोजी HBO सोबतचा करार रद्द केला.

हे सर्व Jio Cinema वर उपलब्ध होईल -

या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, वापरकर्ते जिओ सिनेमावर HBO संबंधित सामग्री, हाउस ऑफ द ड्रॅगन, द लास्ट ऑफ अस, सॅक्सेशन आणि द व्हाईट लोटस इत्यादी स्ट्रीम करू शकतील. याशिवाय गेम ऑफ थ्रोन्स, बिग लिटल लाईज, चोरनोबिल आणि वीप इत्यादी प्रसिद्ध मालिका HBO पाहण्यास सक्षम असतील.

OTT प्लॅटफॉर्मला मोठा धक्का -

रिलायन्सच्या या हालचालीमुळे, Netflix, Amazon आणि Disney Plus Hotstar सारख्या प्रसिद्ध OTT स्ट्रीमिंग अॅप्सना युजरबेसच्या बाबतीत मोठा धक्का बसू शकतो कारण Warner Brothers आणि HBO ची सामग्री भारतात खूप पसंत केली जाते. रिलायन्सने आधीच जिओ सिनेमावर टाटा आयपीएल आणून इतर OTT अॅप्सना मोठी स्पर्धा दिली आहे.

जिओ सिनेमाचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल -

अलीकडेच असे वृत्त आले होते की रिलायन्स जिओ सिनेमासाठी सशुल्क सदस्यता जाहीर करू शकते. कंपनी तीन प्रकारचे प्लॅन तयार करण्यावर काम करत आहे आणि या अंतर्गत यूजर्स विविध कंटेंट ऍक्सेस करू शकतील. माहितीनुसार, कंपनी Jio सिनेमासाठी 2 रुपये, 99 रुपये आणि 599 रुपयांचे प्लॅन आणू शकते. सशुल्क आवृत्तीचे नाव जिओ प्रीमियम असेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : दैव बलवत्तर! पिकअपची जोरदार धडक, स्कूल बसमध्ये आरपार घुसल्या लोखंडी सळ्या

Farmer : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; शिवसैनिक उतरले रस्त्यावर, धुळ्यासह नांदेड, बुलढाण्यात आंदोलन

Indian Air Force Day: 'फायटर' पासून 'स्काय फोर्स' पर्यंत, भारतीय हवाई दलाच्या शौर्य दाखवतात 'हे' चित्रपट

Property In Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाजवळ बजेटमधील घरं कुठे मिळतील, अंदाजे किंमती किती? वाचा सविस्तर

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

SCROLL FOR NEXT