Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : तिला किंवा त्याला तुमच्याशी लग्न करायचे आहे की, नाही? या ५ गोष्टींवरुन कळेल

Married Life : खरेतर लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबाचे असते. त्यासाठी काही निर्णय घेताना बरेचदा आपल्याला विचार करावा लागतो. प्रेमापासून सुरु झालेला हा प्रवास यशस्वीरित्या लग्नापर्यंत अनेकांना पोहोचवायचा असतो.

कोमल दामुद्रे

Signs Which shows she/he does not want to marry you :

लग्नसराई सुरु झाली की, प्रत्येक प्रेमी जोडप्याला असे वाटते की आपणही लग्न करावे. इतक्या वर्षापासून सोबत असणाऱ्या नात्याला गोड नाव द्यावे. खरेतर लग्न हे दोन व्यक्तींचे नसून दोन कुटुंबाचे असते. त्यासाठी काही निर्णय घेताना बरेचदा आपल्याला विचार करावा लागतो.

प्रेमापासून सुरु झालेला हा प्रवास यशस्वीरित्या लग्नापर्यंत अनेकांना पोहोचवायचा असतो. परंतु, अनेकदा नात्यात अशा गोष्टी घडतात ज्यांच्यामुळे जोडीदार (Partner) लग्न करण्यास मनाई करतो. पण जर तुम्हाला लग्न करायचे असेल परंतु, तुमचा तो किंवा ती नकार देत असेल तर कसे ओळखाल. जर तुमचा जोडीदार लग्नाचा विषय काढल्यानंतर या ५ गोष्टी वारंवार करत असेल तर त्याला किंवा तिला तुमच्याशी लग्न करायचे नाही यावरुन कळेल.

1. सतत कारण देणे

तुम्ही लग्नाचा विषय काढला की, तुमच्या जोडीदाराकडे त्याविषयीची उत्तरे कायम तयार असतात. कधी करिअरबद्दल, कधी वय, कधी कुटुंब किंवा आणखी अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे ते तुम्हाला नाही म्हणतील. तसेच कारण देऊन तुम्हाला भावनिक करतील.

2. कुटुंबाला न भेटण्याची इच्छा

तुमच्या नात्याबद्दल (Relationship) अधिक गंभीर असाल तुमच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्र-मैत्रिणीशी ओळख करु द्यायचा विचार करता. अशावेळी पार्टनर नाही म्हणत असेल किंवा आता नको नंतर कधी. खूप घाई होते अशा गोष्टी सतत बोलतात.

3. भविष्याबद्दल बोलताना तुमचा विचार नसणे

अनेकदा करिअर किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल विचार करताना तुम्हाला लक्षात न घेणे. कोणत्याही योजनांमध्ये स्नान नसणे. यावरुन कळेल की, तुमचे नाते किती घट्ट आहे.

4. लग्नाबाबत नकारात्मक विचार

लग्नाचा (Marriage) विषय निघाला की, सतत नकारात्मक विचार करुन बोलणे. तसेच दुसऱ्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलणे. त्याच्याशी कारण नसताना नातं जोडण्याचा विचार करणे. यांसारख्या गोष्टी वारंवार घडत असतील तर तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला नात्यात कोणताही रस नाहीये असे समजावे.

5. सतत इतरांबद्दल बोलणे

तुम्ही सोबत असताना तिला किंवा त्याला इतरांबद्दल बोलण्याची सवय असणे. त्याच्या चांगुलपणाचे कौतुक करणे. तुमची इतरांसोबत तुलना करणे. यावरुन ती तुमच्याशी लग्न न करण्याच्या विचारात असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT