असं म्हटलं जातं की, स्त्रियांना समजून घेणे फार कठीण असते. त्यांच्या मनात आणि डोक्यात नेमके काय सुरु असते याचा थांगपत्ता अजिबात लागू देत नाही. परंतु, ती आणि तो दोघेही मिळून आपलं नातं फुलवण्याचा प्रयत्न करत असतात.
भावी आयुष्यासाठी अनेक स्वप्न देखील रंगवत असतात. नात्यात (Relation) अनेकदा भावना जपणं खूप महत्त्वाचे असते. अनेकदा पुरुष महिलांबद्दल न समजणाऱ्या गोष्टींनाही मूर्खपणा मानतात. परंतु, वेळोवेळी आपल्याला जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे. बहुतेक पुरुष मंडळी महिलांच्या नेमक्या अपेक्षा काय असतात तेच समजून घेत नाहीत. प्रत्येक महिलेला आपल्या पार्टनरकडून (Partner) काही अपेक्षा असतात. त्या समजून घेतल्यातर नात्यात कधीच दूरावा येणार नाही. त्यासाठी पुरुषांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जाणून घेऊया त्याबद्दल
1. स्मॉल टॉक
महिलांना (Women) आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत कधीच स्मॉल टॉक करायला आवडत नाही. त्यांना भरभरून बोलायचे असते. दिवसभरात झालेल्या सगळ्या घटना त्यांना सांगयच्या असतात. परंतु, बरेचदा या गोष्टीला टाळले जाते. त्यामुळे तिचा हिरमोड होतो.
2. प्राधान्य
महिलांना असे वाटते की, आपल्या पार्टनरने आपल्याला सगळ्यात आधी प्राधान्य द्यावे. पण ही इच्छा कधीच ती व्यक्त करुन दाखवत नाही. यासाठी पुरुषांनी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. पुरुषांनी त्यांच्यासोबत चांगलं जगावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं.
3. आदर
अनेकदा महिला आपल्या पार्टनरसोबत प्रेमाने बोलतात. त्याबदल्यात त्यांना देखील पार्टनरकडून प्रेमभावना अपेक्षित असते. परंतु, बरेचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या भावनाचा अनादर केला जातो. त्यामुळे त्या दु:खी होतात. अशावेळी व्यक्त होताना ती इतर अनेकप्रकारे भावना व्यक्त करते.
4. शारीरिक संबंध
स्त्रिया कधीच आपल्याला पार्टनरला शारीरिक सुखाबद्दल बोलून दाखवत नाही. परंतु, याचा अर्थ असा कधीच होत नाही की, त्यांना या गोष्टींची आवड नसते. त्यामुळे आपल्या पार्टनरच्या गरजा किंवा त्यांना नेमके काय हवे आहे हे पुरुषांनी वेळीच ओळखाण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यांना समजून घेणे जास्ती गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.