Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : ब्रेकअप होण्याची 'ही' आहेत कारणे; वेळीच काळजी घ्या, नंतर होईल पश्चाताप

Couple Relationship Tips : तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचं नातं ब्रेकअपपर्यंत जाऊ नये, तर खालील गोष्टी एकदा नक्की ट्राय करा. ज्यामुळं तुमचं नातं तुटण्याऐवजी अधिक बहरेल.

Apurva Kulkarni

प्रेमाचं नातं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि हवीहवीशी गोष्ट आहे. रिलेशन अधिक मजबूत बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात. एकमेकांना गिफ्ट देणे, काळजी करणे, अश्या अनेक गोष्टीद्वारे नात्यांमध्ये प्रेम व्यक्त केलं जातं. परंतु काही अश्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या नात्यात अडथळा निर्माण करु शकतात. त्या छोट्या छोट्या गोष्टी कधी-कधी ब्रेकअपच कारणही बनतात. त्यामुळे वेळीच सावध होत काही गोष्टीकडे काळजीपूर्वक पहायला हवं. ज्यामुळं तुमचं नातं तुटण्याऐवजी अधिक बहरून येईल.

नातं टिकवण्यासाठी दोघांनीही काळजी घेत एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. नवीन प्रेम आधी हवहवसं वाटतं. नात्याची खरी सुरुवात होते ते रिलेशिपच्या 2 ते 3 वर्षानंतर. काही वर्षानंतर नात्यात खटके उडायला लागतात. पार्टनरच्या चुका समोर येयला लागतात. विनाकारण वाद व्हायला लागतात, आणि त्या वादाचं रुपांतर नंतर ब्रेकअपमध्ये होतं. त्यामुळं पार्टनरला समजून घेऊन नातं पुढे नेलं तर, ते अधिक मजबून आणि घट्ट बनतं.

1) एक्सबाबत पार्टनरसोबत चर्चा करणं थांबवा

तुम्हाला जर तुमचं नातं टिकवायचं असेल तर एक्सबाबत चर्चा करणं पार्टनरसोबत थांबवलं पाहिजे. तसंच पास्टमधील व्यक्तीची पार्टनरसोबत तुलना करणं ही तुमच्या ब्रेकअपचं कारणं ठरू शकतं. त्यामुळे होईल तेवढं पार्टनरच कौतूक करा. त्यातच तुमचं भलं आहे.

2) छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणं थांबवा

तुम्हाला जर तुमचं नातं अधिक फुलवायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालणं, चिडणं थांबवा. त्यामुळे तुमचं नात्याला एक वेगळंच वळण येईल. डोकं शांत ठेऊन पार्टनरसोबत चर्चा करा. त्यामुळे तुम्हीही आनंदी रहाल आणि तुमचा पार्टनरही.

3) पार्टनरसोबत खोटं बोलणं टाळा

नात्याचा भक्कम आधार आहे, खरं बोलणं. नातं टिकवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी खरं बोलणं गरजेचं आहे. पार्टनरला धोक्यात ठेऊन तुम्ही काही काम करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो.

4) चूक झाली तर माफी मागा

नात्यामध्ये त्याग, समर्पण जितकं महत्वाचं आहे, तितकच माफी मागणं देखील महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर चूक कोणाचीही असो माफी मागा आणि मोकळं व्हा. तुम्ही माफी मागितली तर पार्टनरच्या मनात तुमचं स्थान अधिक वाढले.

5) पार्टनरला वेळ द्या

तुम्हाला जर तुमचं नातं अधिक फुलवायचं असेल तर पार्टनरला वेळ द्या, पार्टनरसोबत फिरायला जा, पिक्चरला जा, डिनरला जा त्यामुळं पार्टनरला तुम्ही हवेहवेसे वाटाल.

या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं नातं अधिक दृढ बनवेल. त्यामुळे लगेच या वरील गोष्टी वापरात आणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Small Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

७५ व्या वर्षी ३५ वर्षाच्या मुलीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच वृद्धाचा मृ्त्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील थरारक ट्रेकिंग स्पॉट, पर्यटक येथे जाताना 100 वेळा विचार करतात

Ladki Bahin Yojana : लाडकीसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी सरकारचा आणखी एक नियम, पती किंवा वडिलांची माहिती द्यावीच लागेल, वाचा

SCROLL FOR NEXT