Breast and colon cancer risk reduction saam tv
लाईफस्टाईल

Cancer Research: ब्रेस्ट आणि आतड्यांच्या कॅन्सरचा धोका 40 टक्क्यांनी होईल कमी; केवळ 'हा' एक पदार्थ खाणं टाळा, संशोधनातून उघड

Breast and colon cancer risk reduction: अलीकडील संशोधनात असे आढळले आहे की, काही विशिष्ट प्रकारच्या आहाराचे अतिसेवन केल्याने कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. तज्ज्ञांनी ५,४०,००० हून अधिक महिलांच्या आहाराच्या सवयी आणि त्यांचा आरोग्यावर होणारा प्रभाव यावर सखोल अभ्यास केला.

Surabhi Jayashree Jagdish

बदलती जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होतेय. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचं प्रमाण देखील वाढतंय. गेल्या काही दशकांमध्ये जगभरात ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालीये. दरम्यान शास्त्रज्ञांनी या आजारांमागील मुख्य कारण काय आहे हे समजून घेण्याचा केला. अशातच नुकतंच एक संशोधन करण्यात आलं असून स्तन आणि कोलन कॅन्सरबाबत काही धक्कादायक माहिती समोर आलीये.

काही खाद्यपदार्थांमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका?

अलिकडच्या एका अभ्यासातून असं दिसून आलंय की, विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांचं जास्त सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनात ५,४०,००० हून अधिक महिलांच्या आहाराचा आणि त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.

या संशोधनात असं समोर आलं आहे की, ज्या व्यक्ती लोक जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले मांस (जसे की सॉसेज, सलामी, बेकन आणि हॉट डॉग) खातात त्यांना ब्रेस्ट आणि आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका ४०% वाढू शकतो.

प्रोसेस्ड मीटमुळे कस वाढतो कॅन्सरचा धोका

यावेळी संशोधकांना असं आढळून आलं की, प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये असलेले नायट्रेट्स आणि नायट्रेट्स सारखे केमिकल्स कॅन्सरजन्य असू शकतात. हे केमिकल्स शरीरात प्रवेश करून तुमच्या पेशींना नुकसान करतात. यामुळे या पदार्थांचं दीर्घकाळ सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.

त्याचप्रमाणे प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये मीठ आणि संरक्षक घटकांचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. या पदार्थांमुळे आतड्यांमध्ये जळजळ होण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. परिणामी कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर आपण आपल्या आहारातून प्रोसेस्ड मीटचा समावेश टाळला तर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो. यावेळी तुम्ही त्याऐवजी आहारात ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य आणि नैसर्गिक प्रोटीन स्रोत यांचा समावेश केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT