झान्ना सॅमसोनोवा ही एक रशियन इन्फ्लुएंनसर आहे. ३९ वर्षाच्या झान्नाने मागील एका दशकापासून फक्त शाकाहारी (Vegan)पदार्थांचे सेवन केले असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक वर्ष व्हेगन पदार्थ खात असलेल्या झान्नाचा मृत्यू झाला आहे.
झान्ना ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती. ती नेहमी सोशल मीडियावर व्हेगन पदार्थांच्या जाहिरात करायची. एका वृत्तानुसार २१ जुलै रोजी दक्षिणपूर्व आशियात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला आहे.
कमीत कमीत एका दशकापासून झान्ना सर्व कच्च्या शाकाहारी पदार्थांचे सेवन करत होती. काही महिन्यांपूर्वी, श्रीलंकेत असताना ती थकलेली दिसत होती. तर सुजलेल्या पायांमुळे (Leg) तिच्या पायातून लिम्फ निघत होता.
झान्नाच्या मृत्यूबाबात खुलासा करताना तिच्या मित्राने म्हटले की, त्यांनी तिला उपचारासाठी (Treatment) पाठवण्यात आले होते परंतु ती तिथूनही पळून गेली.
तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीने झान्नाच्या मृत्यूबद्दल सांगितले की, मी तिच्या वरच्या मजल्यावर राहत होती. रोज सकाळी उठून झान्ना असेल की नाही अशी भीती मला नेहमी वाटायची. मी तिला उपचार घेण्यासाठी समजावले परंतु ती काही तयार झाली नाही.
झान्नाच्या आईने मुलीच्या मृत्यूमागचे कारण सांगितले. झान्नाचा मृत्यू 'कॉलेरा'सारख्या संसर्गाने झाला असल्याचे तिने सांगितले. मात्र अजूनही डॉक्टरांकडून (Doctor) कारण समोर आले नाही. तिच्या आईचे म्हणणे आहे की, ती सर्व शाकाहारी पदार्थांना बळी पडली. मागच्या सात वर्षांपासून ती फक्त प्लांट बेस फूड खात होती. तिने तिच्या इंस्टाग्रामवर व्हेगन फूड बाबत अनेक पोस्टही केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.