Ration Card Holders Saam Tv
लाईफस्टाईल

Ration Card Holders : 'या' शिधापत्रक धारकांना मिळणार मोफत गहू, तांदूळ, तेल आणि मीठ; असा घेता येईल लाभ

सरकारने रेशनकार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे.

कोमल दामुद्रे

Ration Card Holders : नुकतेच सरकारने दिवाळीचा शिधा मोफतमध्ये नागरिकांना वाटप केला होता. जर तुम्ही देखील नियमितचे शिधापत्रकधारक असाल तर तुम्हाला देखील मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

कारण सरकारने रेशनकार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच सरकारने मोफत रेशनसोबत तेल आणि मीठाची पाकिटेही मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. आता रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे, म्हणजेच यापुढे ग्राहकांना अधिकाधिक गहू आणि तांदूळाचा लाभ मिळणार आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर, सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ मिळेल. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे.

सरकार देशभरातील शिधापत्रिकाधारकांना अनेक सुविधा देत असून, त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. यासोबतच कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत कोट्यवधी लोकांना सरकारने मोफत रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लोकांना त्याचा लाभ दिला जात आहे.

तेल आणि मीठ मोफत मिळेल

यासोबतच ज्या शिधापत्रिकांकडे मीठ, तेल (Oil), हरभरा यांची पाकिटे शिल्लक असतील, त्यांना शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हा नियम (Rules) पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

लाखो कार्डे रद्द करण्यात आली आहेत

सध्या देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना गरीब कल्याण योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आतापर्यंत सरकारने सुमारे 10 लाख कार्डधारकांची कार्डे रद्द केली आहेत. रेशनकार्डच्या सुविधेचा लाभ अनेक अपात्र लोकही घेत आहेत, त्यामुळे सरकारने सर्व अपात्र लोकांची कार्डे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अपात्र कार्डधारकांचा डाटा डीलर्सना पाठवला जात आहे, जेणेकरून या लोकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून रेशन वसूल करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT