Ratha Saptami 2025 saam tv
लाईफस्टाईल

Ratha Saptami 2025: सुर्यदेवाची अपार कृपा मिळवा रथसप्तमीला; जाणून घ्या योग्य वेळ, तारिख, मुहूर्त

Ratha Saptami 2025 Date: सुर्यदेवाची उपासना केल्याने मनातल्या इच्छा पुर्ण होतात असे मानले जाते. यासाठी हिंदूधर्मात रथसप्तमी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी उपासना केल्याने जीवनातले दुख नाहीसे होते आणि आनंदाचा समावेश होतो.

Saam Tv

सुर्यदेवाची उपासना केल्याने मनातल्या इच्छा पुर्ण होतात असे मानले जाते. यासाठी हिंदूधर्मात रथसप्तमी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी उपासना केल्याने जीवनातले दुख नाहीसे होते आणि आनंदाचा समावेश होतो. पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात ही सप्तमी साजरी केली जाते. तर यंदाच्या सप्तमी बद्दल लोकांच्या मनात शंका आहे. ०४ फेब्रृवारी की, ०५ फेब्रृवारी नेमकी कोणत्या दिवशी ही सप्तमी साजरी केली जाणार आहे. हे आपण पुढील माहिती द्वारे समजून घेऊ.

रथ सप्तमी तारिख

भारतीय पंचांग पद्धतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमी व्रत केले जाते. यंदा ०४ फेब्रृवारी २०२५ रोजी हे व्रत ठेवले जाणार आहे. याची वेळ ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर ०५ फेब्रृवारी २०२५ ला मध्यरात्री ०२ वाजून ३० मिनिटांनी समाप्त होणार आहे. रथसप्तमीचे व्रत हे एक सौर व्रत आहे. ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका प्रारंभतिथी म्हणून महत्वाची मानण्यात आली आहे.

रथसप्तमीत असे दोन दिवसही एकत्र असल्याने हा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. तर रथसप्तमीचा ब्रह्ममुहूर्त ०५ वाजून २३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर याची समाप्ती ०६ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. तसेच या दिवसाचा अमृत काल हा दुपारी ०३ वाजून ०३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर समाप्त ०४ वाजून ३४ मिनिटांनी होईल.

रथसप्तमीचा अभिजीत मुहूर्त हा दुपारी १२ वाजून १३ मिनिटांनी होईल आणि समाप्त १२ वाजून ५७ मिनिटांनी होईल. रथसप्तमीचा विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २४ मिनिटांनी सुरु होईल तर ०३ वाजून ०८ मिनिटांनी समाप्ती होणार आहे. या दिवशी स्नान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ०५ वाजून २३ मिनिटांनी सुरु होईल तर ०७ वाजून ०८ मिनिटांनी समाप्त होईल. या वेळेत स्नान केल्याने सूर्य देवाची उपासना करू शकता. त्याने तुमच्यावर आलेले संकट टळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT