Raksha Bandhan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2024 : घरच्या घरी बनवा शुगर फ्री मिठाई, डायबिटीज रुग्णांनाही सणासुदीत घेता येईल गोड पदार्थांचा आनंद!

Sugar Free Sweets For Diabetes Patients : सणासुदीला डायबिटीज रुग्णांनाही गोड पदार्थांचा आस्वाद घेता यावा म्हणून घरीच सिंपल पद्धतीने शुगर फ्री मिठाई बनवा. झटपट रेसिपी जाणून घ्या.

Shreya Maskar

श्रावण महिना म्हटलं की, सणासुदीचा माहोल असतो. या महिन्यात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सण येतात. सण म्हटलं की,गोड मिठाई आली. मात्र मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांना सणासुदीला गोड काय खायचे? असा प्रश्न पडतो. यावर रामबाण उपाय म्हणजे शुगर फ्री मिठाई होय.

यंदा सणासुदीच्या काळात डायबिटीज रुग्णांसाठी घरीच शुगर फ्री मिठाई बनवा. सिंपल रेसिपी नोट करा.

बदाम बर्फी

साहित्य

मावा, बदाम, सुकामेवा, वेलची पावडर, जायफळ पावडर

कृती

शुगर फ्री बदाम बर्फी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मावा आणि बारीक केलेले बदाम छान परतून घ्या. आता यात सुकामेवा, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एक प्लेटला तूप लावून हे बर्फीचे मिश्रण पसरवा. फ्रिजमध्ये हे मिश्रण सेट होण्यासाठी ६ ते ७ तास ठेवा. बर्फी सेट झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे कापून आस्वाद घ्या.

नाचणीचे लाडू

साहित्य

नाचणी, मीठ, तूप, खजूर, सुकामेवा, उसाच्या रस

कृती

नाचणीचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम नाचणी भाजून घ्या. आता मिक्सरला नाचणी आणि मीठ बारीक करून घ्या. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात तूप घाला आणि छान एकजीव करून घ्या. हे मिश्रण तूपात पुन्हा भाजा. मिश्रणाला सुगंध आल्यास त्यात खजूर आणि सुकामेवा टाका. या मिश्रणात नाचणीचे पीठ घाला आणि उसाच्या रसाच्या मदतीने लाडू छान वळून घ्या. पौष्टिक नाचणीचे लाडू तयार झाले.

फिरनी

साहित्य

दूध, तांदूळ, वेलची, सुकामेवा, गुलाब पाणी, उसाचा रस

कृती

फिरनी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये तांदूळ आणि दूध घालून पेस्ट बनवून घ्या. आता एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवून त्यात तांदळाची पेस्ट घालून नीट उकळवा. मंद आचेवर फिरनी शिजवून घ्या. शेवटी वेलची पावडर, थोडा उसाचा रस आणि गुलाब पाणी टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. अशाप्रकारे शुगर फ्री फिरनी तयार झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT