Control Sugar Level : सकाळी उठल्यावर शुगर वाढतेय; रात्री झोपण्याआधी 'ही' कामे करा डायबिटीज कंट्रोलमध्ये राहिल

Diabetes Level Under Control: काही व्यक्तींनातर सकाळी उठल्यावर देखील चक्कर येतात तेव्हा त्यांची शुगर वाढलेली असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढू नये यासाठी काही रात्री झोपण्याआधी काय काळजी
Diabetes Level Under Control
Control Sugar Level Saam TV

डायबिटीज असलेल्या व्यक्तींना स्वत:च्या तब्येतीला फार जपावं लागतं. काही चुकीचे पदार्थ खाल्ले किंवा झोपण्याच्या वेळा तसेच व्यायाम न केल्यास डायबिटीज लगेचच वाढते. शुगर जास्त वाढल्यास इंन्सुलीनची देखील गरज भासते. काही व्यक्तींनातर सकाळी उठल्यावर देखील चक्कर येतात तेव्हा त्यांची शुगर वाढलेली असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढूनये यासाठी रात्री झोपण्याआधी काय काळजी घ्यावी याची माहिती जाणून घेऊ.

Diabetes Level Under Control
Yoga Tips For High BP : हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही योगासने करा, जाणून घ्या सविस्तर

रात्रीचं जेवण

रात्रीचं जेवण हेल्थी असणं गरजेचं असतं. त्यामुळे रात्रीच्या जेवणातील पदार्थ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि हेल्दी फॅटचे मिश्रण असलेले असणे गरजेचे आहे. रात्रीच्यावेळी जास्त प्रमाणात देखील जेवण करू नये. आवडीची भाजी असल्यास काही व्यक्ती जास्त जेवण करतात मात्र तसे केल्याने शुगर वाढू शकते.

चहा पिऊ नका

मधुमेह असलेल्या व्यक्तींना किमान ७ ते ८ तासांची झोप मिळणे गरजेचे असते. परंतू काही व्यक्ती रात्री झोपण्याधी चहा किंवा कॉफी पितात. चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन असतं. त्यामुळे जेवणाआधी चहा किंवा कॉफी पिल्याने झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्याने डोकेदुखीसह, रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.

शतपावली

जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. मधुमेह असलेल्या रुग्णांनी जेवण झाल्यानंतर काही वेळ शरीराची हालचाल केली पाहिजे. त्यासाठी जेवण झाल्यावर अंगणात किंवा इमारतीच्या खाली १५ मिनिटे शतपावली करा. त्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि रक्तातील साखर देखील वाढत नाही.

मेडीटेशन

ज्या ज्या व्यक्तींचे वय ५० च्या वर आहे आणि त्यांना डायबिटीजचा जास्त त्रास आहे अशा व्यक्तींनी मेडीटेशन केले पाहिजेच मेडिटेशन करताना काही वेळ दिर्घ श्वासोच्छवास केला पाहिजे. असे केल्याने डोकं शांत राहतं, झोपही वेळेत लागते आणि शुगर वाढत नाही.

टीप : डायबिटीजच्या समस्यांवर हा उपाय म्हणजे सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Diabetes Level Under Control
Blood Sugar Control Diet: उन्हाळ्यात डायबिटीज वाढतोय? आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा, साखर नियंत्रीत राहिल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com