Raksha Bandhan Special Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Recipe For Raksha Bandhan : रक्षाबंधनाला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मिठाई बनवा अन् पैसे वाचवा; पहा रेसीपी

Raksha Bandhan Special Recipe: भाऊ बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन सण येऊन ठेपला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधननिमित्त खास रेसीपी :

भाऊ बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन सण येऊन ठेपला आहे. भाऊ बहिणीच्या नात्याचा हा सण असतो. सण म्हटलं की, गोडाचे पदार्थ हे असतातच. असाच एक पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

येत्या 30 तारखेला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधननिमित्त अनेक नवनवीन राख्या बाजारात (Market) आल्या आहेत. भावाने बहिणीला देण्याच्या भेटवस्तूही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. परंतु स्वतः च्या हाताने केलेलं काहीतरी बहिणीला देणे हे तिच्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असेल. तुम्ही जर तुमच्या बहिणीला असाच एक मिठाईचा प्रकार बनवून खायला घाला.

सण आणि मिठाईचे अतुट नाते आहे. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी घरात काहीतरी गोडाचा पदार्थ बनतो. येत्या रक्षाबंधनला साधा, सरळ आणि चवदार असा पदार्थ तुम्ही घरी नक्की करुन पाहा.

नारळ आइस्क्रिम

साहित्य

2 कप सुके खोबरे, 1 वाटी साखर, 3-4 चमचे तूप, 2 चमचे खवा

कृती

  • प्रथम साखरेचा पाक तयार करा.

  • सिरपमध्ये डेसिकेटेड नारळ (Coconut) घाला आणि चांगले मिसळा.

  • हे मिश्रण मध्यम गॅसवर थोडा वेळ शिजवून घ्या.

  • आता त्यात तूप आणि 1 वाटी खवा घालून मिक्स करा.

  • सतत ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

  • नंतर त्यात चिमूटभर वेलची घाला.

  • आता प्रथम एका प्लेटला तूप लावा.

  • त्यात नारळाचे मिश्रण काढा.

  • आता हे मिश्रण प्लेटमध्ये चांगले पसरवा आणि आपल्या आवडीच्या आकारात कापून घ्या.

सफरचंद पुडिंग

साहित्य

3 कप दूध, 4-5 सफरचंद, 1 टेबलस्पून तूप, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 टीस्पून ड्रायफ्रुट्स, साखर गरजेनुसार

कृती

  • प्रथम सफरचंद किसून घ्या, आता तुपात चांगले तळून घ्या.

  • दुसरीकडे, एका पॅनमध्ये दूध (Milk) उकळवा, थंड होण्यासाठी ठेवा.

  • आता थंड दुधात भाजलेले सफरचंद आणि वेलची पावडर घाला.

  • हे मिश्रण चांगले मिक्स करून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

  • सफरचंद खीर सर्व्ह करताना ड्रायफ्रुट्सने सजवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT