Indian Railway: आणखी ९० गाड्यांना 'विस्टाडोम' जोडणार - Saam TV
लाईफस्टाईल

Indian Railway: आणखी ९० गाड्यांना 'विस्टाडोम' जोडणार

सध्या विस्टाडोम डबे असलेल्या ४५ एक्स्प्रेस धावत आहेत. अशा डब्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय रेल्वेवर लवकरच ९० विस्टाडोम डबे सुरू करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे

साम टिव्ही

मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना निसर्गदर्शन होण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने काही एक्स्प्रेसना विस्टाडोम डबा जोडला आहे. त्याअंतर्गत सध्या विस्टाडोम डबे असलेल्या ४५ एक्स्प्रेस धावत आहेत. अशा डब्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतीय रेल्वेवर लवकरच ९० विस्टाडोम डबे सुरू करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. (Railway to attach more Vista domes on trains)

मध्य रेल्वेमार्फत (Railway) मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव आणि डेक्कन क्वीन अशा तीन एक्स्प्रेसना विस्टाडोम जोडण्यात आला आहे. प्रेक्षणीय निसर्गसौंदर्य असलेले मार्ग प्रामुख्याने विस्टाडोम असलेल्या गाड्यांसाठी निवडले जातात. प्रवासी संख्या, दिवसा होणारा प्रवास आणि प्रवाशांची मागणी याचा विचार करून मगच एखाद्या गाडीला विस्टाडोम डबा जोडण्यात येतो.

अशा डब्यांमध्ये काचेच्या पारदर्शक छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरणारी आसन व्यवस्था, पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, विजेवर चालणारे स्वयंचलित सरकते दरवाजे इत्यादी वैशिष्ट्ये असतात. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाईल फ्लोअरिंग असलेली स्वच्छतागृहे आणि दर्शन गॅलरीही आहे. त्यामुळे प्रवासी अधिक पैसे मोजून विस्टाडोम डब्यातून प्रवास करण्यास पसंती देतात. एक्स्प्रेसच्या संरचनेत विस्टाडोम डबे वापरून एक्स्प्रेस चालविण्याचे मार्ग निवडले जातात.

सध्या सुरू असलेल्या विस्टाडोम एक्स्प्रेस
- उत्तर रेल्वेअंतर्गत कालका-शिमला एक्स्प्रेस, ईशान्य रेल्वेअंतर्गत मैलानी-बिचिया विशेष ट्रेन आणि दक्षिण पश्चिम रेल्वेअंतर्गत यशवंतपूर-मंगलोर एक्स्प्रेस, यशवंतपूर-कारवार एक्स्प्रेस आणि यशवंतपूर-शिवामोग्गा एक्स्प्रेस
- पश्चिम रेल्वेमार्फत अहमदाबाद-केवडिया महू-पाताळपाणी कालाकुंड आणि बिलीमोर-वाघाई एक्स्प्रेस
- पूर्वोत्तर सीमावर्ती रेल्वेअंतर्गत अलीपूरद्वार-न्यू जलपाईगुडी एक्स्प्रेस, गुवाहाटी-बदरपूर एक्स्प्रेस, नाहरलगून-एक्स्प्रेस आणि दार्जिलिंग-हिमालयीन रेल्वे
- पूर्व कोस्ट रेल्वेअंतर्गत विशाखापट्टणम-किरंदुल एक्स्प्रेस
- मध्य रेल्वेअंतर्गत मुंबई-पुणे एक्सप्रेस, मुंबई-मडगाव एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT