Holi 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2022: आजपासून या 5 राशींचं नशीब चमकणार, होळीला फक्त रंग नाही पैसेही बरसणार

जाणून घ्या कोणत्या राशीसाठी राहूचे हे राशीपरिवर्त शुभ ठरणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राहू ग्रहाने आज 17 मार्चला आपली राशी बदलून मेष राशीत प्रवेश केला आहे. 18 महिन्यांनंतर राहूचे संक्रमण झाले आहे. शनिनंतर राहू हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. राहू आणि केतू हे असे ग्रह आहेत जे नेहमी उलटे फिरतात. राहू वृषभ सोडून मेष राशीत प्रवेश करेल. यावेळी होलिका दहनाच्या दिवशी राहू राशी बदलत आहे. जाणून घ्या कोणत्या राशीसाठी राहूचे हे राशीपरिवर्त शुभ ठरणार (Rahu Transit Going Change These 5 Zodiacs Life Has Get More Money And Promotion) -

मिथुन (Gemini)

राहूच्या संक्रमणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. त्यांना धनलाभ होईल. पदोन्नती मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल.

वृश्चिक (Scorpio)

राहूचा मेष राशीत प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. त्यांना पदोन्नती, पगारवाढ मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. तुम्ही भरपूर पैसे कमवाल आणि चांगली बचत देखील करु शकाल. नवीन व्यवसाय (Business) सुरु करु शकता.

कर्क (Cancer)

राहूच्या राशी बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभेल. त्यांनी काहीही केले तरी त्यांना यश मिळेल. करिअर-व्यवसायासाठी चांगला काळ असेल. धनलाभ होईल. परदेश प्रवासाची शक्यता आहे.

कुंभ (Sagittarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण खूप शुभ राहील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा मोठे यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होईल. रखडलेले पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठाही राहुचे राशी परिवर्तन लाभदायक ठरु शकते. त्यांचे उत्पन्नही वाढू शकते आणि अचानक त्यांना कुठून पैसेही मिळू शकतात. केवळ बोलण्याच्या जोरावर मोठमोठी कामेही करवून घेता येतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

(टीप - वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: दिवाळीत अस्थमाच्या रुग्णांचा वाढू शकतो त्रास, अशी घ्या काळजी

Maharashtra Politics : ऐन दिवाळीत शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Live News Update: फटाक्यांची ठिणगी उडाल्याचा जाब विचारल्याने वॉचमनने केली मारहाण

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

SCROLL FOR NEXT