Non Fried Puri Saam TV
लाईफस्टाईल

Non Fried Puri: अरेच्चा! उकळत्या पाण्यात तळली पुरी; डाएटसाठी ऑइल फ्री फूडची भन्नाट रेसिपी व्हायरल

Puri Fried In Water: ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. एका महिलेने तेलात न तळलेली एक ऑइल फ्री पुरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर कली आहे.

Ruchika Jadhav

Zero Oil Puri:

आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या डाएटवर विशेष लक्ष देत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशात अनेक व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर, रक्तातील साखर अशा समस्या आहेत. त्यामुळे ऑइल फ्री जेवणावर अनेक जण भर देतात. अशात तुम्ही कधी तेलात न तळलेली पण टम्म फुगलेली पुरी खाल्लीये का?

ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. एका महिलेने तेलात न तळलेली एक ऑइल फ्री पुरी कशी बनवायची याची रेसिपी शेअर कली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणीने पाण्यामध्ये मस्त लाटलेल्या पुऱ्या तळून घेतल्यात. तिने हे कसं केलं याची सिक्रेट रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

पीठ

मीठ

दही

पाणी

एअर फ्राइंग टेम्ट

कृती

सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. गव्हाचं पीठ बारीक दळलेलं असावं याची काळजी घ्या. त्यानंतर या पीठात तुमच्या चवीनुसार मीठ मिसळा. पुढे त्यात ५ चमचे दही मिक्स करा. दही गोड असावे आणि ताजे असावे. तसेच ते अजिबात अंबट नसावे याची खात्री करून घ्या. नंतर हे पीठ मलमलच्या कापडाखाली आर्धा तास मुरवत ठेवा.

त्यानंतर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. तोवर तयार कणकेचे छोटे छोटे गोळे करा आणि समान आकारात पुरी लाटा. पुरी लाटून झाल्यावर उकळत्या पाण्यात टाका. पुरी पाण्यात वर तरंगत नाही तोवर ठेवा. पुरी वरती आल्यावर ती अलगत काढून घ्या. त्यानंतर एअर फ्राइंग टेम्टमध्ये ही पुरी फुगण्यासाठी ठेवा. ५ ते ६ मिनीटांत टम्म फुगलेली तुमची पुरी तयार.

ही ऑइल फ्री पुरी तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता. आरोग्यासाठी अशी पुरी फार फायदेशीर आहे. या पुरीमध्ये तेलाचा एक थेंब देखील नाही. @nehadeepakshah या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मास्टरशेफ इंडियाची उपविजेती नेहाची ही रेसिपी आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT