Heart Problem  Saam TV
लाईफस्टाईल

Heart Problem : जास्त प्रोटीन्समुळे तुमचं हृदय कमजोर होतंय; संशोधनातून मोठा खुलासा

Ruchika Jadhav

हृदयविकाराच्या झटक्याने आजवर अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकमुळे थेट हृदयावर आघात होतो. सध्य प्रत्येक व्यक्तीची जीनवशैली फार बदलली आहे. जीवनशैली बदलत असल्याने व्यक्ती आपला संपूर्ण दिवस एका जागी बसून काम करत घालवतता. शरीराची अजिबात झिज होत नसल्याने याचा थेट परिणाम व्यक्तीच्या हृदयावर होतो.

जिम आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना देखील हार्टअटॅक येण्याच्या घटना घडल्या आहेत. जिम करणाऱ्या व्यक्ती फक्त व्यायाम करत नाही तर त्यासह विविध प्रकारचे प्रोटीन देखील घेतात. मात्र जास्त प्रोटीनचे सेवन करणे त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक असते, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

हाय प्रोटीन डाएटचे नुकसान

प्रोटीन खाणे वाईट नाही मात्र प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे त्यानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन केले पाहिजे. जास्त सेवन केल्यास मृत्यू ओढावण्याची शक्यता असते. अमेरिकाच्या पिट्सबर्ग यूनिवर्सिटीमधील स्कूल ऑफ मेडिसिन रिसर्चमध्ये प्रोटीन आणि हार्टअटॅक बद्दल दावा केला आहे.

प्रोटीन आपल्या शरीरातील नसा ब्लॉक करते. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर प्रोटीनमुळे आपल्या नसांमध्ये रक्त घट्ट होतं. नसांमध्ये रक्त अडखळत असेल आणि ब्लॉकेज वाढत असतील तर त्याने आपल्या हृदयाला योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. परिणामी त्या व्यक्तीला हार्टअटॅक येतो. तसेच किडनीच्या देखील काही समस्या उद्भवतात.

दिवसभरात किती प्रोटीन घेतलं पाहिजे?

प्रत्येक व्यक्तीने संपूर्ण दिवसभरात १ किलो वजनासाठी १ ग्रॅम प्रोटीन अशा प्रमाणात प्रोटीन पावडरचे सेवन केले पाहिजे. म्हणजे तर एखाद्या व्यक्तीचं वजन ७० किलो असेल तर त्या व्यक्तीने ७० ग्रॅम इतकंच प्रोटीन दिवसभरात खाल्ल पाहिजे, अशी माहिती अमेरिकेच्या नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

कोणत्या पदार्थात किती प्रोटीन

शरीराला प्रोटीन मिळावं म्हणून विविध पावडर खाण्यापेक्षा शेतात उगवणाऱ्या या भाज्या सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्यामुळे आता कोणत्या भाजीत किती प्रोटीन असतं याची माहिती जाणून घेणार आहोत.

100 ग्रॅम राजमामध्ये 24 ग्रॅम इतकं प्रोटीन असतं.

100 ग्राम चण्यांमध्ये 19 ग्रॅम प्रोटीन असतं.

100 ग्राम सोयाबीनमध्ये 36 ग्रॅम प्रोटीन असतं.

100 ग्राम डाळीमध्ये 22 ग्रॅम प्रोटीन असते.

100 ग्राम मूग डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT