आज प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात आपल्याला प्रेशर कुकर Pressure Cooker पाहायला मिळतो. प्रेशर कुकर हा स्वयंपाक घरातील एक महत्वाची वस्तू आहे. प्रेशर कुकर अनेक गृहिणींचा एक चांगला मित्र आहे. कुकर प्रत्येक घरात हमखास वापरला जातो. परंतु, कुकरचा अधिक वापर केल्यामुळे त्याच्या रिंग सैल पडू लागते. त्यामुळे अनेकदा कुकर लावल्यावर शिट्टी होत नाही आणि झाकणातून वाफ बाहेर जाते. म्हणूनच, कुकरची रिंग Ring सैल झाली असल्यास या समस्येवर कसा तोडगा काढायचा ते आज आपण या लेखातून जाणून घेऊया...
रिंग कापा - रिंग प्रमाणापेक्षा जास्त सैल झाली असेल तर थोडी कट करा आणि त्यानंतर झाकणाचा अंदाज घेऊन शिवून टाका अथवा टेप लावा. त्यामुळे तात्पुरते का होई ना पण तुमचे काम नक्कीच होऊ शकते.
हे देखील पहा -
स्वच्छता बाळगा - रिंगमध्ये काही अन्नपदार्थ अडकल्यामुळे रिंग सैल होऊ शकते. रिंगमध्येअन्नपदार्थ अडकले तर रिंग लवकर खराब होते. त्यामुळे कुकर धुतांना रिंग सुद्धा स्वच्छ धुवा.
रिंग गार पाण्याने धुवा - कुकरची रिंग रिंग सैल झाल्याचे जाणवलास रिंग बर्फाच्या गार पाण्याने धुवा. त्यानंतर ही रिंग पुन्हा तुमच्या कुकरला बसवा. गार पाण्यामुळे रिंगचं रबर काही काळासाठी घट्ट होते ज्यामुळे ही रिंग आपण पुन्हा वापरू शकतो.
फ्रिजमध्ये ठेवा - कुकरची रिंग सैल झाल्यावर ही रिंग १५ मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. ज्यामुळे रिंगचे रबर घट्ट होणार आणि तुम्ही ही रिंग आपण पुन्हा वापरू शकणार. असे केल्यास काही काळ ही रिंग नक्कीच चालेल.
टेप लावा - कुकरची रिंग सैल झाली असेल तर रिंगच्या दोन्ही बाजूला टेप लावा. ज्यामुळे काही काळासाठी तरी तुमचे स्वयंपाक घरातील काम सोपे होईल.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.