Potholes on roads saam tv
लाईफस्टाईल

20-55 वयोगटासाठी रस्त्यावरील खड्डे ठरतायत धोकादायक; पाठदुखी-फ्रॅक्चरची समस्या बळावत असल्याचा डॉक्टरांचा इशारा

खराब रस्त्यांवर, खड्ड्यांमधून हेल्मेट घालून गेल्यासही त्या वजनामुळे आणखी त्रास होतो. पावसाळ्यात पाणी साठलेल्या खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही किंवा स्पीडब्रेकर लक्षात न आल्यामुळे बसणाऱ्या हादऱ्याचेही शरीरावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईमध्ये खड्ड्यांचं प्रमाण अधिक आहे. यावेळी रस्त्याने प्रवास करत असलेल्यांना खड्ड्यामुळे बसणाऱ्या हादऱ्यामुळे त्याचा पाठीच्या कण्यावर सर्वाधिक परिणाम होतो. ज्या व्यक्तींना फ्रोझन शोल्डर, सांधेदुखीसारखे विकार आहेत, त्यांना याचा त्रास अधिक होतो. वाहन विशेषतः टू व्हिलर चालवण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांचा हा विकार बळावतो. 

यामध्ये व्यक्तीला नसांवर दाब येऊन स्नायू आखडून आणखी त्रास होतो. औषधं घेऊन व्यायाम करूनही उपयोग होत नाही. खराब रस्त्यांवर, खड्ड्यांमधून हेल्मेट घालून गेल्यासही त्या वजनामुळे आणखी त्रास होतो. पावसाळ्यात पाणी साठलेल्या खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही किंवा स्पीडब्रेकर लक्षात न आल्यामुळे बसणाऱ्या हादऱ्याचेही शरीरावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात.

20-55 वयोगटातील व्यक्तींना अधिक त्रास

20-55 वयोगटातील अनेक दुचाकीस्वारांना पाठदुखी, मान आणि स्लिप्ड डिस्कचा दीर्घकाळ त्रास होऊ शकतो, काहींना फ्रॅक्चर होऊ शकते. शिवाय, गरोदर स्त्रिया ज्या बाइकवरून प्रवास करतात त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गंभीर आरोग्य समस्या उदभवू शकतात आणि त्यांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. 

पाठदुखीची सुरुवात पाठीच्या खालच्या भागापासून सुरु होते आणि पाय (सायटिका) पर्यंत पसरू शकते. मान किंवा पाठदुखीचे कारण शोधण्यासाठी, डॉक्टर एक्स-रे आणि एमआरआय सारख्या चाचण्या करण्यास सांगतील. एखाद्याला दररोज कमी तीव्रतेचे  व्यायाम, संतुलित आहार, स्ट्रेचिंग किंवा योगा आणि फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी एखाद्याला जागरूक राहावे लागेल आणि तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल अशी माहिती मुंबईतील ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन प्रा डॉ. धीरज सोनवणे यांनी दिलीये.

22-50 वयोगटातील दुचाकी स्वारांमध्ये पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या आजकाल चिंताजनक बाब ठरतेय. बाईक किंवा स्कुटी चालवणाऱ्यांमध्ये खड्डेमय रस्त्यावर आदळल्यानंतर अचानक धक्का बसतो, दुचाकी स्वाराच्या मणक्यावर ताण येऊ शकतो आणि पाठीच्या खालच्या भागात दुखू शकते. उपचार न केलेल्या पाठीच्या दुखण्यामुळे कालांतराने लंबर स्पॉन्डिलायटिसची समस्या उद्भवू शकते त्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. 

डॉ. सोनवणे पुढे म्हणाले की, प्रवासापूर्वी वाहनचालकांनी स्ट्रेचिंग करणं आणि कमी तीव्रतेचे व्यायाम करणं ही काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे पोहणं आणि सायकल चालवणं यांसारखे इतर क्रिया पाठदुखी, नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs), हॉट कॉम्प्रेस हे तुमच्या वेदनेचे व्यवस्थापन करण्यास मदत करतील. पुरेशी विश्रांती आणि अगदी स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे पाठदुखीचा सामना करण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT